नेरपिंगळाईत शेतकरी आत्महत्या झालेल्या प्रकाश पोटे यांच्या कुटुंबाला माजी आमदार यशोमती ठाकूर यांनी भेट देऊन अश्रु पुसले
नेरपिंगळाई येथील कर्ज बाजारी शेतकरी प्रकाश पोटे यांनी राहत्या घरात आत्महत्या केली. त्यांच्या कुटुंबाला आमदार यशोमती ठाकूर यांनी भेट देऊन पोटे कुटुंबाचे अश्रु पुसले, सढळ हातांनी केली मदत.
नेरपिंगळाई येथील अल्पभुधारक कर्जबाजारी शेतकरी प्रकाश पोटे यांच्यावर ट्रॅक्टर व उसनवारी आणि शेतीवर मोठ्या प्रमाणात कर्ज असल्याने त्यात ही तीन एकर शेतीत सतत नापिकींनी चिंताग्रस्त झाल्याने प्रकाश पोटे यांनी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. शेतकरी आत्महत्या झाल्यावरही त्यांच्याकडे कुणीच भेट देने उचित समजले नाही अश्यातच ही माहिती लोकप्रिय माजी आमदार यशोमतीताई ठाकूर यांना मिळताच त्यांनी प्रकाश पोटे यांच्या कुटुंबाला भेट दिली. परिवारातील सदस्यांनी अपल्या अश्रुरुपी भावना व्यक्त करत यशोमतीताई ठाकूर यांच्याकडे भावना व्यक्त करत शासन मदतीची मागणी केली. ताईंनी सर्वप्रथम भेट देऊन पोटे कुटुंबाला सढल हातांनी मदत केली. यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रमेश काळे, राजुकाका ठाकूर, डॉक्टर धंजय तट्टे, साजिद पठान, खलील भाई, सतिश इंगळे, अतुल खोडस्कर, पवन काळमेघ, संजय माहोकार, अल्पजा बडासे, रमाताई इंगळे, सविता खोडस्कर व सर्व काँग्रेस कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.