पोलिस पुत्राची बापाच्या रिव्हॉल्व्हरने आत्महत्या…

मुंबई पोलिस पोलिस दलातील पोलिस हेड कॉन्स्टेबलच्या मुलाने वडीलांच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली असून हर्ष म्हस्के असे या मुलाचे नाव आहे.२० वर्षीय हर्षने आपल्या वडिलांच्या सर्विस रिवॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मुंबईच्या लोअर परेल भागातील ना.म.जोशी मार्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. हर्ष म्हस्केने वडिलांच्या रिवॉल्व्हरमधून डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे.हर्षचे वडील संतोष म्हस्के हे पोलिस हेड कॉन्स्टेबल असून ते एसपी युनिटमध्ये कार्यरत आहेत. हेड कॉन्स्टेबल संतोष म्हस्के हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याकडे काही काळ बंदोबस्तासाठी तैनात होते. मुंबई पोलिस आणि गुन्हे शाखेचे पथक संतोष म्हस्के यांच्या घरी दाखल झाले असून या घटनेचा तपास करीत आहेत. हर्षने आत्महत्या का केली, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करीत असून त्याचे प्रेत उत्तरीय तपासणी साठी पाठविण्यात आले आहे.