LIVE STREAM

Latest NewsMaharashtra

भंडाऱ्यात दारुगोळा निर्मिती कारखान्यात भीषण स्फोट, पाच कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू

  एक अत्यंत धक्कादायक घटना घडलीये. या घटनेने मोठी खळबळ निर्माण झाल्याचे बघायला मिळतंय. भंडारा येथील जवाहरनगरच्या दारुगोळा निर्मिती कारखान्यात मोठा स्फोट झालाय. आयुध निर्माण कारखान्यात हा भीषण स्फोट झाल्याने खळबळ उडालीये. या स्फोटादरम्यान अत्यंत मोठा आवाज झाला. हैराण करणारे म्हणजे या स्फोटात जीवितहानी देखील झालीये. फॅक्टरीच्या आर. के. ब्रांच सेक्शनमध्ये हा स्फोट झाल्याची माहिती आहे. या स्फोटानंतरचे काही फोटो आणि व्हिडीओ पुढे आलीत.
 भंडाऱ्यात भीषण स्फोटाची घटना
 या फोटो आणि व्हिडीओवरून स्पष्ट होतेय की, हा स्फोट किती जास्त भीषण आहे. स्फोटानंतर आग आणि पूर्ण धूर हवेत दिसतोय. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या इमारतीमध्ये हा स्फोट झालाय, ती इमारत पूर्णपणे उद्धवस्थ झालीये. सध्या दारुगोळा निर्मिती कारखान्यातचे मोठे अधिकारी, पोलिस अधिकारी आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी हे घटनास्थळी पोहोचले आहेत. मदतकार्य देखील सुरू केल्याची माहिती आहे.

प्राथमिक माहितीनुसार, ज्यावेळी हा स्फोट झाला, त्यावेळी या इमारतीमध्ये सात ते आठ कर्मचारी काम करत होते. विजय वडेट्टीवार यांनी नुकताच याबद्दल माहिती दिलीये. विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे की, प्राथमिक माहितीनुसार या स्फोट 5 जणांचा मृत्यू झालाय. मात्र, अजून तरी ऑर्डनन्स फॅक्टरीकडून किंवा अधिकाऱ्यांकडून या स्फोटात किती जणांचा मृत्यू झाला हे सांगण्यात नाही आले.
या स्फोटात तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केल्याचीही माहिती आहे. स्फोट झालेल्या इमारतीमधील इतर कर्मचाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. सध्या बचावकार्य सुरू आहे. मात्र, ज्या इमारतीमध्ये हा स्फोट झालाय ती पूर्णपणे उद्धवस्थ झाली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!