AmravatiLatest NewsLocal News
“राष्ट्रीय मतदार दिन” म्हणून लोकशाहीवर निष्ठा ठेवण्यासाठी महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त यांच्यासह अधिकारी, कर्मचा-यांनी घेतली शपथ

दिनांक २५/०१/२०२५ रोजी राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात येणार आहे. राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून या दिवशी सर्व मतदारांना लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ दिली जाते. तथापि दिनांक २५ जानेवारी,२०२५ रोजी शनिवार सुट्टीचा दिवस असल्याने दिनांक २४ जानेवारी,२०२५ रोजी लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ घेण्यात यावी असे मा.भारत निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. त्या अनुषंगाने शुक्रवार दिनांक २४ जानेवारी,२०२५ रोजी राष्ट्रीय मतदार दिन साजरा करावयाचा असल्याने लोकशाहीवर निष्ठा ठेवण्यासाठी अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख यांच्यासह अधिकारी व कर्मचा-यांनी शपथ घेतली.
यावेळी उपायुक्त डॉ.मेघना वासनकर, उपायुक्त योगेश पिठे, उपायुक्त नरेंद्र वानखडे, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, उद्यान अधिक्षक श्रीकांत गिरी, कार्यालय अधिक्षक नंदकिशोर पवार, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.