AmravatiLatest News
अमरावतीत त्रिशूलच्या नावावर शस्त्रवाटपाचा आरोप; यशोमती ठाकूर यांनी उघड केली गंभीर बाब

अमरावती जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माजी मंत्री आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी गंभीर आरोप करताना सांगितलं की, जिल्ह्यात त्रिशूलच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर शस्त्र वाटप होत आहे. ग्रामीण आणि शहरी भागात शस्त्रांची गुप्तपणे वितरण होत असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत उघड केलं आहे.
या गंभीर आरोपांनंतर अमरावतीतील पोलीस प्रशासन व राज्य सरकारची भूमिका काय असणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. जर या शस्त्र वाटपामुळे गुन्हेगारी वाढली, तर त्याला जबाबदार कोण, असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. यशोमती ठाकूर यांच्या आरोपांची दखल घेतली जाईल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
“त्रिशूलच्या नावाखाली शस्त्र वाटप करणं खूप गंभीर आहे. याचा गैरवापर होऊ शकतो आणि याला जबाबदार कोण, हा प्रश्न आज विचारायलाच हवा. प्रशासनाने तात्काळ पावलं उचलावीत,” असं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं