गणराज्य दिन संचलनाच्या रजनी शिर्के होणार साक्षीदार.

गणराज्य दिनानिमित्त दिल्लीतील कर्तव्य पथ होणा-या संचलनाच्या यवतमाळ येथील रजनी शिर्के साक्षीदार होण्याचा बहुमान मिळाला आहे. त्यांना केंद्र सरकारतर्फे विशेष निमंत्रण पाठवण्यात आले आहे. राष्ट्रीय महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये लोकसहभाग वाढावा म्हणून २६ जानेवारी रोजी नवी दिल्लीतील कर्तव्य पथावर ७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेड पाहण्यासाठी देशभरातील १० हजार विशेष पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले आहे यात रजनी शिर्के यांचे नाव आहे. विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणारे आणि सरकारी योजनांचा उत्तम वापर करणा-यांना निमंत्रण देण्यात आले आहे. विशेष अतिथी म्हणून गावातील सरपंच, आपत्ती निवारण कर्मचारी, आदर्श गावातील लोक, प्राथमिक कृषी पतपुरवठा (पीएसी) सोसायट्या, वन व वन्यजीव संवर्धन स्वयंसेवक व कामगार, हातमाग कारागीर, विविध योजनांचे आदिवासी लाभार्थी, पॅरालिम्पिक पथक व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे विजेते, शेतकरी, अंगणवाडी सेविका, रस्ते बांधणी कामगार यांचा समावेश आहे. यात विदर्भातून ५१ पाहुण्यांना निमंत्रण मिळाले आहे. यामध्ये नागपुरातील ईश्वरी दत्तात्रय कोल्हे, देजास्वार्तिनी एस. एम. आणि भंडारा
येथील पलाश इलमकर (पंतप्रधान यशस्वी योजना), यवतमाळ येथील रजनी अविनाश शिर्के (राष्ट्रीय पुरस्कार विजेते) यासह 48 जणांचा समावेश आहे.