Latest NewsMaharashtra PoliticsVidarbh Samachar
राष्ट्रीय मतदार दिनी काँग्रेसचे आंदोलन; निवडणूक आयोगाच्या पक्षपाती भूमिकेविरोधात विजय वेडेट्टीवार यांचं नेतृत्व

मागील विधानसभा निवडणुकीत आपले मतदान चोरल्याची भावना मतदारांमध्ये आहे तसेच निवडणूक आयोगाची भूमिका ही पक्षपाती असल्याने आज राष्ट्रीय मतदार दिनी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. लोकसभा ते विधानसभा या निवडणुकीच्या 6 महिन्यात 50 लाख मतदार कसे वाढाले. विधान सभेवेळी 5 वाजल्यानंतर 76 लाख मतदान कसे झाले याचे कुठलेही इतर निवडणूक आयोग कडे नाही. भाजपच्या कार्यकर्ते असल्यासारखे वागत असल्याने निवडणूक आयोगाची स्वायत्तता नष्ट झाली. निवडणूक आयोगाच्या आशीर्वादावर आलेले हे भाजप सरकार आहे. यामुळे आयोगाच्या कृत्यांविरोधात, लोकशाहीचे रक्षण तसेच मतदारांच्या हक्कासाठी राष्ट्रीय मतदार दिनी काँग्रेस कडून विरोधी पक्ष नेते विजय वेडेट्टीवार यंच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यवतमाळच्या संविधान चौकात सदर आंदोलन करण्यात आले. यावेळी यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.