२५ गावांना जोडण्याऱ्या पुलाची मांगणी अनेक वर्षा पासून प्रलंबित
“भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत, तरीही अनेक गावांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव दिसून येतो. मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवरील पैनगंगा नदीवर पूल नसल्याने येथील 25 गावांतील नागरिकांना आजही धोकादायक प्रवास करावा लागत आहे. सरकारी मंजुरीनंतरही पुलाचे काम रखडल्याने गावकरी जीव धोक्यात घालून नदी पार करत असल्याचा हा गंभीर प्रकार आहे. चला, पाहुया या धोकादायक प्रवासाची परिस्थिती.”
“मराठवाड्यातील हदगाव आणि विदर्भातील उमरखेड या शहरांमध्ये फक्त 5 किलोमीटर अंतर असताना, पैनगंगा नदीवर पूल नसल्याने नागरिकांना जवळपास 40 किलोमीटरचा वळसा घालावा लागतो. परिणामी, 25 गावांतील नागरिक लाकडी तराफ्याच्या साहाय्याने पाण्याच्या प्रवाहातून जात आहेत.
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुलासाठी मंजुरी दिली होती, मात्र प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे काम अद्याप सुरू झाले नाही. नागरिकांचे म्हणणे आहे की हा पूल उभारला गेल्यास, अनेकांचे प्रश्न सुटतील आणि त्यांची जीवनशैली सुलभ होईल. प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे.”
“मराठवाडा आणि विदर्भातील या गावांतील नागरिकांना प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. भारताच्या विकासाच्या गतीला गवसणी घालण्यासाठी अशा मागण्या वेळेत पूर्ण होणे अत्यावश्यक आहे.