LIVE STREAM

AmravatiLatest News

अमरावती महानगरपालिकेत प्रजासत्‍ताक दिनाच्‍या ७६ वा समारंभ साजरा

अमरावती महानगरपालिकेत प्रजासत्‍ताक दिनाच्‍या ७६ वा समारंभ महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक सचिन कलंत्रे यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण करुन साजरा करण्‍यात आला. रविवार दिनांक २६ जानेवारी,२०२५ रोजी अमरावती महानगरपालिकेच्‍या प्रांगणात सदर ध्‍वजारोहणाचा कार्यक्रम सकाळी ठिक ८.१५ वाजता घेण्‍यात आला.
दिनांक १०/११/२०२४ रोजी सिटी कोतवाली पोलिस स्‍टेशन समोरील बजाज खिलौना या इमारतीला लागलेली भीषण आग नियंत्रणात आणून इतर इमारतीमध्‍ये लागणारी आग शमविली. मोठ्या प्रमाणात वित्‍त हानी व दुर्घटना घडण्‍यापासून रोखले याप्रसंगी केलेली कामगिरी निश्चितच महत्‍वपूर्ण व दखलपात्र असून त्‍यांची दखल अमरावती महानगरपालिकेने घेतली आहे. आपत्‍तीच्‍या काळात मदत कार्यास तत्‍परतेने धावून येण्‍याचे कर्तव्‍य अग्निशमन विभागाने यापूढेही कायम ठेवाल अशी अपेक्षा व्‍यक्‍त करते. यावेळी महानगरपालिका आयुक्‍त सचिन कलंत्रे, मा.आयुक्‍त यांच्‍या पत्‍नी, अतिरिक्‍त आयुक्‍त महेश देशमुख, उपायुक्‍त डॉ.मेघना वासनकर, उपायुक्‍त योगेश पिठे, उपायुक्‍त नरेंद्र वानखडे, शहर अभियंता ईश्‍वरानंद पानपालिया, मुख्‍यलेखापरिक्षक श्‍यामसुंदर देव, मुख्‍यलेखाधिकारी दत्‍तात्रय फिस्‍के यांचे हस्‍ते महानगरपालिका प्रांगणात प्रजासत्‍ताक दिनाच्‍या ७६ वा समारंभ दिनानिमित्य अमरावती महानगरपालिका तर्फे अग्निशमन विभागातील ट्रान्‍सपोट नगर येथील केंद्र प्रमुख सैय्यद अनवर सैय्यद अकबर, प्रशांत नगर येथील केंद्र प्रमुख अजय रामभाऊ पंधरे, वालकट कंम्‍पाऊंड येथील केंद्र प्रमुख प्रेमानंद श्रीराम सोनकांबळे, बडनेरा येथील केंद्र प्रमुख वैभव पद्माकर गजभारे यांचा प्रशस्‍तीपत्र व पुष्‍पगुच्‍छ देवून सत्‍कार करण्‍यात आला. तसेच दिनांक २६ जानेवारी,२०२५ प्रजासत्‍ताक दिनाच्‍या ७६ वा समारंभ दिनानिमित्‍य “क्षयरोग शपथ” यावेळी मा.आयुक्‍त यांच्‍यासह सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी घेतली.
अमरावती महानगरपालिकाद्वारा पर्यावरण पुरक गणेश मंडळ स्‍पर्धा २०२४ आयोजित करण्‍यात आली होती. यामध्‍ये सहभागी मंडळांपैकी पर्यावरण पुरक गणेशोत्‍सव साजरा करण्‍याचे उल्‍लेखनिय कामगिरी बाबत गणेश मंडळांचा पुरस्‍कार समारंभ तसेच स्‍पर्धेमध्‍ये सहभागी मंडळाची तपासणी, परिक्षण कार्य करण्‍याकरीता समिती स्‍थापित करण्‍यात आली होती. सदरहु कार्य निष्‍पक्ष, निस्‍वार्थीपणे करुन मोलाची भुमिका पार पाडणारे, उत्‍कृष्‍ट कार्य व स्‍पर्धा यशस्‍वी होण्‍याकरीता घेतलेल्‍या परिश्रमाबद्दल समिती सदस्‍यांचा गौरव समारंभ आज दि.२६ जानेवारी,२०२५ रोजी ध्‍वजारोहणाचे कार्यक्रमानंतर आयोजित करण्‍यात आले होते. पर्यावरण पुरक गणेशोत्‍सव साजरा करण्‍याचे उल्‍लेखनिय कामगिरी बाबत महानगरपालिका आयुक्‍त सचिन कलंत्रे, मा.आयुक्‍त यांच्‍या पत्‍नी, अतिरिक्‍त आयुक्‍त महेश देशमुख, उपायुक्‍त डॉ.मेघना वासनकर, उपायुक्‍त योगेश पिठे, उपायुक्‍त नरेंद्र वानखडे, शहर अभियंता ईश्‍वरानंद पानपालिया, मुख्‍यलेखापरिक्षक श्‍यामसुंदर देव, मुख्‍यलेखाधिकारी दत्‍तात्रय फिस्‍के यांचे हस्‍ते प्रथम पुरस्‍कार श्री एकविरा गणेशोत्‍सव मंडळ गौरक्षण यांना रु.५१,०००/-, व्दितीय पुरस्‍कार श्री बजरंग गणेशोत्‍सव मंडळ पटवीपुरा यांना रु.२१,०००/-, तृतीय पुरस्‍कार श्री श्रीकृष्‍ण गणेशोत्‍सव मंडळ, श्रीकृष्‍ण पेठ यांना रु.११,०००/-, प्रोत्‍साहनपर श्री जयहिंद गणेश मंडळ, काटीपुरा बडनेरा यांना रोख रक्‍कम, प्रमाणपत्र, स्‍मृतीचिन्‍ह, शाल व श्रीफळ देवून पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात आले.
तसेच स्‍पर्धेमध्‍ये सहभागी मंडळांची तपासणी, परीक्षण कार्य करण्‍याकरीता गठीत समिती श्री मधुकर घारड, तांत्रिक सदस्‍य, वृक्ष प्राधिकरण समिती‍, अमरावती, डॉ.शिवाजी देशमुख, सदस्‍य, जैवविविधता व्‍यवस्‍थापन समिती, मनपा तथा प्राध्‍यापक, विदर्भ विज्ञान महाविद्यालय, अमरावती, डॉ.उज्‍वला देशमुख, प्राध्‍यापक, विदर्भ विज्ञान महाविद्यालय, अमरावती, डॉ.संगिता इंगोले, पर्यावरण विभागप्रमुख, श्री‍. शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती, डॉ.किर्तीध्‍वज गवई, प्राध्‍यापक, पर्यावरण विभाग, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती, श्री कैलास रोतळे, सचिव, कुंभार मातीकला सुधार समिती, अमरावती, श्री श्रीकांत डवरे, स्‍वास्‍थ अधिक्षक (समन्‍वयक), महानगरपालिका, अमरावती यांना मा.आयुक्‍त यांच्‍याहस्‍ते प्रमाणपत्र देवून गौरविण्‍यात आले.
यावेळी अतिरिक्‍त आयुक्‍त महेश देशमुख, उपायुक्‍त डॉ.मेघना वासनकर, उपायुक्‍त योगेश पिठे, उपायुक्‍त नरेंद्र वानखडे, शहर अभियंता ईश्‍वरानंद पनपालिया, मुख्‍यलेखापरिक्षक श्‍यामसुंदर देव, मुख्‍यलेखाधिकारी दत्‍तात्रय फिस्‍के, सहाय्यक आयुक्‍त भुषण पुसतकर, सहाय्यक आयुक्‍त दिप्‍ती गायकवाड, सहाय्यक आयुक्‍त सुभाष जानोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ.अजय जाधव, कार्यकारी अभियंता रविंद्र पवार, सिस्‍टीम मॅनेजर अमित डेंगरे, शिक्षणाधिकारी डॉ.प्रकाश मेश्राम, पशुशल्‍य चिकीत्‍सक डॉ.सचिन बोंन्‍द्रे, कार्यालय अधिक्षक नंदकिशोर पवार, भांडार अधिक्षक मंगेश जाधव, कार्यशाळा उपअभियंता लक्ष्‍मण पावडे, मालमत्‍ता अधिकारी दिपक खडेकार, प्रधानमंत्री आवास योजनेचे उपभियंता सुनिल चौधरी, वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रतिभा आत्राम, वैद्यकीय अधिकारी डॉ.फिरोज खान, उपअभियंता प्रमोद इंगोले, नितीन बोबडे, हेमंत महाजन, दिनेश हंबर्डे, अजय विंचुरकर, एस.एस.तिनखेडे, राजेश आगरकर, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी महानगरपालिका आयुक्‍त सचिन कलंत्रे यांनी भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या मंगलमय प्रसंगी, अमरावतीच्या जनतेला व उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्‍या.
अमरावती महानगरपालिकेच्या वतीने अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहे. सर्वच घटकातील विचारांच्या समाजघटकांना सोबत घेऊन, सर्वांना विकासाची समान संधी उपलब्ध करुन प्रगत, समर्थ आणि बलशाली अमरावती घडविण्यासाठी महानगरपालिका काम करीत आहे.
देशाच्या राज्यघटनेप्रती आपणा सर्वांचे उत्तरदायित्व आहे, आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्याने संविधानाने घालून दिलेले आदर्श व मूल्ये यांच्याप्रती असलेली आपली बांधिलकी अधिक दृढ करुया आणि एक बलशाली, प्रगतीशील व सर्वसमावेशक अशा नवीन अमरावतीच्या निर्मितीसाठी कटीबध्द होऊ या, असे यावेळी महानगरपालिका आयुक्‍त सचिन कलंत्रे यांनी सांगितले.
यावेळी प्रजासत्‍ताक दिनाच्‍या ७६ वा समारंभ दिनानिमित्‍त शिक्षक विजय खंडारे यांनी देशभक्‍तीपर महाराष्‍ट्र गीत सादरीकरण केले. यावेळी महानगरपालिका आयुक्‍त सचिन कलंत्रे यांच्‍या हस्‍ते शाळेतील विद्यार्थ्‍यांना खाऊचे वाटप करण्‍यात आले.
यावेळी महानगरपालिका मराठी माध्‍यमिक मुलांची शाळा वडरपुरा येथील विद्यार्थ्‍यांच्‍या बँन्‍ड पथकाने यावेळी राष्‍ट्रगीत सादर केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एन.बी. सोनवणे सर व विजय खंडारे सर यांनी केले.
यावेळी विश्‍वरत्‍न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या वेशभुषेत अभिनेता सर्जेराव गलपट उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!