AmravatiLatest News
दोन खाजगी ट्रॅव्हल्स चालकांचा वाद चव्हाट्यावर मात्र पोलीस प्रशासनाच्या कर्तव्याचे बिंग उघड

पंचवटी ते वेलकम पॉईंटपर्यंत अवैध व्यवहारांवर पोलीस शांत का आता एका खाजगी वाहनसंचालकांनी उठवलेल्यान खळबळजनक प्रश्नावरून गाडगे नगर पोलीस वाहतूक पोलीस सह आर टी पोलीस संशयाच्या भोवऱ्यात पुन्हा सापडले आहे आणि याच मुद्द्यावर पुन्हा आता, प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. खाजगी ट्रॅव्हल्स असो किंवा चारचाकी वाहन असो अनेक वाहनाला प्रवासी बसवून नेण्याची परवानगी नसताना सुद्धा खुलेआम मोठमोठ्याने गावांच्या नावाचा उल्लेख करून वाहतूक केली जाते. मात्र तरी सुद्धा गाडगे नगर पोलीस परिक्षेत्र सह वाहतूक पोलीसानी चुप्पी साधली आहे. गाडगे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुख्यात टोळ्यांचा संबंध अवैध वाहतुकीत संबंध ? नागरिकांमध्ये वाढत चाललेला अविश्वास.
पंचवटी ते वेलकम पॉईंटदरम्यान सुरू असलेल्या वाहन व्यवसाय आणि गाडगे नगर परिसरातील अवैध व्यवसायांबाबत पोलीसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, पोलीसांनी या भागात कुख्यात व्यक्तींना वाहन व्यवस्थापन आणि इतर व्यवसायांची जबाबदारी दिली आहे, ज्यामुळे अवैध धंद्यांना चालना मिळत आहे. कुख्याता चा पंचवटी चौक ते वेलकम पॉईंट पर्यत अवैध वाहतुकीत गाडगे नगर तत्कालीन पोलीस निरीक्षक गिरमे यांच्या कार्यकाळातील प्रकरण असल्याची जोरदार चर्चा आहे. सुरु असलेल्या अवैध धंद्यांशी संबंधित हे प्रकरण पोलीस निरीक्षक गिरमे यांच्या कार्यकाळाशी जोडले गेले आहे. नागरिकांचा आरोप आहे की, गिरमे यांच्या काळात या कुख्यात व्यक्तींना संरक्षण मिळू लागले, आणि हे सर्व अजूनही सुरळीत सुरु आहे पोलीसांवर आता थेट खुल्लेआम सार्वजनिक आरोप,केल्या जात आहे मात्र नागरिकांमध्ये संभ्रम आहे. अलीकडेच २४ जानेवारीला आर टी ओ कार्यालय समोर करण्यात आलेल्या आंदोलनात, एका व्यक्तीने थेट पोलिसांसमोरच माईकवरून पोलीसांवर गंभीर आरोप करत खुलेआम अपशब्द वापरले. या आरोपांमध्ये गाडगे नगर पोलीसांच्या निष्क्रियतेबद्दल आणि कुख्यात व्यक्तींना मिळालेल्या संरक्षणाविषयी चर्चा झाली. या आरोपांमुळे पोलीसांची प्रतिमा डागाळली असून, नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. एक नाही तर तीन व्यक्तीने खाजगी ट्रॅव्हल्स मधून अवैध वाहतूक करणाऱ्या इसमाविरुद्ध आणि त्याला आश्रय देणाऱ्या आर्थिक मलाई खाणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्या विरुद्ध थेट संताप व्यक्त केला होता.
असाच अवैध वाहतूक प्रकरणावर या आधी अनेकदा सीटी न्यूजने अनेक वृतांत प्रसारित केले होते मात्र पोलिसांनी बनवाबनवी करून उलट गाडगे नगर पोलीस अधिकाऱ्याच्या नेतृत्वात काही पोलिसांनी गुन्हेगारी वृत्तीच्या टोळीला छुपछुपे साथ दिल्याचे दिसून आले. सीटी न्यूजने याआधीही अनेक वेळा या प्रकरणावर प्रकाश टाकला होता. अवैध गाड्या आणि गैरकायद्याचे व्यवसाय यावर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमध्ये गाडगे नगर पोलीसांच्या निष्क्रियतेवर प्रश्न विचारण्यात आले. नागरिकांचे म्हणणे आहे की, या अवैध कृतींमुळे परिसरात गुन्हेगारी वाढत आहे आणि असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. आरोप आहे की, पोलीसांनी ‘येथील ट्रॅव्हल्स’ व्यवसाय कुख्यात व्यक्तींना सोपवले आहे. आता हे कुख्यात लोक पोलीस ठाण्यावरही आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रश्न असा आहे की, अशा परिस्थितीत पोलीस कारवाई का करत नाहीत? गाडगे नगर पोलीस आणि वाहतूक पोलीसांच्या शांततेवर नागरिकांचा आता प्रश्न उपस्थित होत आहे. नागरिकांना जाणून घ्यायचे आहे की, पोलीसांनी अशा अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई न करण्यामागील कारण काय आहे. लोकांचे म्हणणे आहे की, जर पोलीस असेच निष्क्रिय राहिले, तर जनतेचा पोलीसांवरील विश्वास संपूर्णपणे नष्ट होईल.
पोलीसांवर जनतेचा दबाव वाढत चालला आहे. लोकांची मागणी आहे की, गाडगे नगर ते वेलकम पॉईंटदरम्यानच्या सर्व अवैध व्यवहारांची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी. जर वेळेत पोलीसांनी ठोस पावले उचलली नाहीत, तर ही पोलीस प्रशासनाची मोठी अपयश ठरेल. पोलीसांविरुद्ध चौकशी होणार का?आता अशा मागणीला चांगलाच जोर धरत आहे.
या प्रकरणात पोलीस प्रशासनाच्या भूमिकेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. हे सुनिश्चित करणे गरजेचे आहे की, कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी अशा अवैध कृत्यांमध्ये सहभागी होऊ नये… नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे देणे आणि परिसरात सुरक्षा पुन्हा प्रस्थापित करणे हे आता पोलीस प्रशासनासमोरील सर्वांत मोठे आव्हान ठरले आहे