LIVE STREAM

Latest NewsMaharashtra

महाराष्ट्रातील ४३ पोलिसांचा सन्मान; रवींद्र सिंघल, दत्तात्रय कराळे, संजय दराडे, अरुण डुंबरे यांना राष्ट्रपती पदक

  प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशभरातील ६३४ पोलिसांना शनिवारी राष्ट्रपती पदके जाहीर करण्यात आली. पोलिस दलात केलेले शौर्य, उल्लेखनीय सेवा आणि गुणवत्तापूर्वक कामगिरीबद्दल महाराष्ट्रातील ४३ पोलिसांना गौरविण्यात येणार आहे. चार पोलिसांना उल्लेखनीय सेवेबद्दल तर ३९ पोलिसांना गुणवत्तापूर्वक सेवेसाठी ही पदके जाहीर करण्यात आली आहेत. राज्यातील पदक विजेत्यांमध्ये नागपूरचे आयुक्त रवींद्र सिंघल, कोकण परिक्षेत्राचे महानिरीक्षक संजय दराडे, महानिरीक्षक दत्ता कराळे, वीरेंद्र मिश्रा, सहायक आयुक्त अरुण डुंबरे या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
 देशभरातील ६३४ पोलिसांना राष्ट्रपती पदके देण्यात येणार असून यामध्ये महाराष्ट्रातील ४३ पोलिसांचा समावेश आहे. नागपूरचे पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल, महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, सुनील फुलारी आणि कमांडंट रामचंद्र केंडे यांना उल्लेखनीय सेवेबद्दल गौरविण्यात येईल.
गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राज्यातील ३९ पोलिसांना राष्ट्रपती पदकांनी सन्मानित केले जाणार आहे. पोलिस दलातील गुणवत्तापूर्वक कामगिरीबद्दल पदक विजेत्यांमध्ये महानिरीक्षक संजय भास्कर दराडे, वीरेंद्र मिश्रा, आरती प्रकाश सिंह, चंद्रकिशोर रामजीलाल मिना, उपमहानिरीक्षक दीपक कृष्णाजी साकोरे, पोलिस अधीक्षक राजेश रामचंद्र बनसोडे, उपअधीक्षक सुनील जयसिंग तांबे, रोशन रघुनाथ यादव, अनिल लक्ष्मण लाड, सहायक आयुक्त ममता लॉरेन्स डिसूझा, धर्मपाल मोहन बनसोडे, अरुण केरभाऊ डुंबरे, निरीक्षक मधुकर माणिकराव सावंत, राजेंद्र कारभारी कोते, सुरेश चिंतामण मनोरे, उपनिरीक्षक नजीर नासीर शेख, श्रीकांत चंद्रकांत तावडे, महादेव गोविंद काळे, तुकाराम शिवाजी निंबाळकर,
 राजेंद्र देवमान वाघ, सहायक उपनिरीक्षक आनंदराव पुंजाराव मस्के, रवींद्र बाबुराव वानखेडे, संजय अंबादासराव जोशी, दत्तू एकनाथ गायकवाड, नंदकिशोर ओंकार बोरोले, आनंद रामचंद्र जंगम, सुनिता विजय पवार, जितेंद्र विठ्ठल म्हात्रे, प्रफुल्ल रामचंद्र सुर्वे, राजेंद्र शंकर काळे, सलीम गनी शेख, तुकाराम रावसाहेब आव्हाळे, सय्यद इक्बाल हुसेन सय्यद माथार हुसेन, रामराव वामनराव नागे, हेड कॉन्स्टेबल रामभाऊ संभाजी खंडागळे, संजय भास्करराव चोबे, विजय दामोदर जाधव, दिलीप भोजुसिंग राठोड, आयुबखान अकबर मुल्ला यांचा समावेश आहे.
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!