BollywoodLatest News
मुलीच्या जन्मानंतर पहिल्यांदाचा रॅम्पवर दिसली दीपिका पदुकोण; लूक पाहून नेटकऱ्यांना वाटलं रेखाच आल्या…

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणनं काही महिन्यांपूर्वीच लेकीला जन्म दिला. त्याच्या आधी काही काळापासून तिनं कामापासून ब्रेक घेतला होता. त्यानंतरही बराच काळ ती कुठे दिसली नाही. पण आता दीपिका पुन्हा एकदा वर्क मोडवर आली आहे आणि तिनं प्रेग्नेंसी दरम्यान पहिल्यांदा रॅम्प वॉक केला. दीपिकानं सब्यसाचीसाठी हे वॉक केलं आहे. चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या दीपिकानं तिच्या बेटीच्या जन्मानंतर पहिल्यांदा रनवेवर डेब्यू केला आहे. दरम्यान, सब्यसाचीला 25 वर्ष झाली असून त्यानिमित्तानंचं दीपिकानं त्याच्यासाठी वॉक केलं आहे.
दीपिका पदुकोणनं पांढऱ्या ड्रेसमध्ये यावेळी रॅम्प वॉक करताना दिसली. दीपिकाच्या या नव्या लूकसाठी तिनं हातात काळे ग्लव्स घातले आहेत आणि एक गोल्डन क्रॉस नेकलेस घातला आहे. त्याशिवाय तिनं एक चोकर आणि कड घातलं आहे. जे काळ्या ग्लव्ह्सवर घातले आहेत. दरम्यान, दीपिकाचा आणखी एका लूकमधील व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यापैकी काही फोटो पाहून नेटकऱ्यांनी ती रेखा यांच्यासारखी दिसत असल्याचं म्हटलं आहे. कमेंट सेक्शनमध्ये सगळ्यांच्या अशाच कमेंट आहेत. एक नेटकरी म्हणाला, 'क्वीन अर्थात राणी.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'आई झाल्यानंतर ही आणखी सुंदर दिसायला लागली आहे.' तिसरा म्हणाला 'दीपिका नेहमीच तिच्या हटके लूकनं प्रेक्षकांना आणि चाहत्यांना सरप्राइज करते. यावेळी तिनं हेडबॅंड लावल्यानं सगळ्यांना आणखी एक वेगळा लूक पाहायला मिळाला आहे.'
याशिवाय 25 जानेवारी रोजी काल दीपिकानं प्रेग्नेंसी नंतर पहिल्यांदा वॉक केलं. तर 2018 मध्ये याच दिवशी तिचा ‘पद्मावत’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केलं होतं. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन आता 7 वर्ष झाली आहे.