LIVE STREAM

Latest NewsMaharashtra Politics

कृष्णा आंधळे जिवंत नसावा, घातपात झाला असावा; संदीप क्षीरसागरांचा खळबळजनक दावा

विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर ठाकरे गटाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. यावरुनच ठाकरे भाजपच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा केला जातोय. आदित्य ठाकरे यांनीही मुख्यमंत्री फडणवीस यांची तीन वेळा भेट घेतली होती. यावरुनच जोरदार चर्चा सुरु झाली. अशाताच आता भाजपचा मित्रपक्ष असलेल्या बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी मोठा दावा केला आहे. तसेच संजय राऊतांना मोठा झटका बसणार असल्याचेही रवी राणा यांनी म्हटलं आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. या प्रकरणाच्या तपासाची चक्रे वेगाने फिरत असले तरी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून दबाव वाढत आहे. दरम्यान, संतोष देशमुख प्रकरणातील चौथा आरोपी कृष्णा आंधळे आता जिवंत नसेल असा मला संशय आहे, धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला शिवाय चौकशी व्यवस्थित होणार नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते संदीप क्षीरसागर म्हणाले आहेत. प्रशासनाला मोकळेपणाने तपास करायचा असेल, तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे, असंही ते म्हणाले. पहिल्यांदाच हा विषय बाहेर आला आहे, आणि जर एखाद्या व्यक्तीला पकडायचे ठरवलं तर तो 24 तासात सापडतो; त्यामुळे कृष्णा आंधळे याच्या जीवाशी घातपात झाला असावा, असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

संतोष देशमुख प्रकरणातला मुख्य आरोपी कुष्णा आंधळे अजूनही पोलिसांच्या ताब्यात नाही. 2023 मध्येही त्याच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. तरी त्याला अटक झाली नव्हती. मागील चार वर्षांत त्याच्यावर सहा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्याने धारूर, आंबाजोगई, आणि केज पोलीस ठाण्यांमध्ये खंडणी, मारामारी, आणि खुनाचे प्रयत्न यांसारखे गंभीर गुन्हे केले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून संतोष देशमुख प्रकरणात आरोपी फरार होतोच कसा त्याला फरार करण्यात कोणाचा हात आहे? असे अनेक सवाल अजूनही अनुत्तरीतच आहेत.
काय म्हणाले संदीप क्षीरसागर ?
बीड मधील अनेक प्रकरण समोर येणार आहेत. लोकं स्वतःहून पुढे येऊन बोलत आहेत. संतोष देशमुख प्रकरणातील चौथा आरोपी कृष्णा आंधळे आता जिवंत नसेल असा मला संशय आहे.धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायलाच हवा त्याशिवाय चौकशी व्यवस्थित होणार नाही. बीड जिल्हा शल्य चिकित्सक चुकीच काही करत असतील असं मला अजिबात वाटत नाही.

संदीप क्षीरसागर यांनी संतोष देशमुख प्रकरणाबाबत खळबळजनक वक्तव्य करताना कृष्णा आंधळे जिवंत नसेल, असा संशय व्यक्त केला. त्यांनी म्हटलं की, एखादा विषय अंगलट येतो तेव्हा तो माणूस गायब होतो, आणि मला वाटतं नाही की हा माणूस सापडेल. दादाचा स्वभाव असा आहे की चुकीची गोष्ट त्यांना कधीच पटत नाही. याप्रकरणी सरकारने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या आदेशावरून एसपीची बदली केली आहे. क्षीरसागर म्हणाले की, गुन्हा नोंदवायला दहा-बारा तास उशीर झाला आणि ज्यांनी हा विलंब केला, त्यांच्यावर डीसीआर मिळाल्यावर कारवाई होईल. लोकांनी स्वतःहून रस्त्यावर उतरून या प्रकरणात आवाज उठवला आहे. अन्याय झालेल्या लोकांनी पुढे येऊन बोलायला सुरुवात केली आहे. प्रशासनाला मोकळेपणाने तपास करायचा असेल, तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला पाहिजे, असंही ते म्हणाले. पहिल्यांदाच हा विषय बाहेर आला आहे, आणि जर एखाद्या व्यक्तीला पकडायचे ठरवलं तर तो 24 तासात सापडतो; त्यामुळे कृष्णा आंधळे याच्या जीवाशी घातपात झाला असावा, असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

धनंजय मुंडेच्या राजीनाम्याचा दबाव वाढला
बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड जरी न्यायालयीन कोठडीत असला तरी त्याच्या संपर्कात असलेले 26 अधिकारी व कर्मचारी त्याचा मर्जीतले असल्याचा खळबळजनक आरोप तृप्ती देसाई यांनी केल्यानंतर संदीप क्षीरसागर यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे . या प्रकरणातला प्रमुख आरोपी सुदर्शन घुले याला एसआयटीच्या पुढील तपासासाठी चार दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आल्यानंतर आता या प्रकरणातला चौथा आरोपी कृष्णा आंधळे जिवंत असेल की नाही असा संशय असल्याचं संदीप क्षीरसागर म्हणालेत . बीड जिल्हा शल्यचिकित्सक चुकीचं काही करत असतील असं वाटत नाही पण या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला नंतरच चौकशी नीट होईल असं क्षीरसागर म्हणालेत .कृष्णा आंधळे जिवंत नसावा, घातपात झाला असावा; संदीप क्षीरसागरांचा खळबळजनक दावा

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!