AmravatiLatest NewsLocal News
देशभक्तीचा प्रकाश तेजस्वी करण्यामध्ये बोस यांचे योगदान महत्वाचे – डॉ. मस्के

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक श्रेष्ठ क्रांतिकारक, नेते आणि आझाद हिंद सेनेचे सरसेनापती म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव अग्रक्रमाने घेतल्या जाते. स्वातंत्र्य लढ¬ातील त्यांची कार्यकुशलता इतिहासात अजरामर असलेली दिसून येते. स्वत:च्या प्राणाची पर्वा न करता देशभक्तीचा प्रकाश तेजस्वी करण्यामध्ये बोस यांचे योगदान महत्वाचे असल्याचे, विचार एम.ए. छत्रपती शिवाजी महाराज विचारधारा व व्यवस्थापन अभ्यासक्रमाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. वैभव मस्के यांनी व्यक्त केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्यावतीने नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती कार्यक्रमप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. सुरेश रहाटे उपस्थित होते.
डॉ. मस्के पुढे म्हणाले, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. दूरदृष्टी, आत्मविश्वास, धडाडी आणि निर्भयता यामुळे स्वातंत्र्य लढ¬ात ते डगमगले नाहीत. आपल्या कुशाग्र बुद्धिमत्ता व कठोर परिश्रमाला अभ्यासाची जोड देऊन देशहिताच्या दृष्टीने ध्येय-धोरणांची बांधणी केली. सुभाषचंद्र बोस यांच्या कार्याचा विद्याथ्र्यांनी आदर्श घ्यावा व समाज हितासाठी पुढे यावे असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
अध्यक्षीय भाषणातून डॉ. सुरेश रहाटे म्हणाले, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा स्वातंत्र्य चळवळीतील इतिहास खया अर्थाने आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी असून अश्या थोर महापुरुषांच्या विचारांचा जागर व्हावा, विद्याथ्र्यांमध्ये समाज, देशहिताची भावना निर्माण व्हावी, असेही ते म्हणाले. विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रास्ताविक प्रा. आदित्य पुंड, सूत्रसंचालन कु. वैशाली लहाने, तर आभार सुधीर कोल्हे यांनी मानले. कार्यक्रमाला शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.