AmravatiLatest News
महात्मा गांधी यांची पुण्यतिथी निमित्य शहिदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात येणार व सायरन वाजणार

गुरुवार दिनांक ३० जानेवारी,२०२५ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आहे, हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येतो. महानगरपालिकेच्या प्रांगणात सकाळी १०.५० वाजता मा.आयुक्त सचिन कलंत्रे भा.प्र.से. तसेच अधिकारी, कर्मचारी शहिदांना दोन मिनिटे मौन पाळून श्रध्दांजली अर्पण करणार आहेत.
३० जानेवारी रोजी नागरीकांनी मौन पाळून श्रध्दांजली अर्पण करण्याकरीता सुचना म्हणून महानगरपालिका सकाळी १०.५९ ते ११.०० वाजेपर्यंत मौन पाळण्याबाबत सायरन वाजविणार आहे. तसेच मौन सोडण्याकरीता पुन्हा ११.०२ ते ११.०३ ला सायरन वाजविणार आहे. सायरनची चाचणी बुधवार दिनांक २९ जानेवारी,२०२५ रोजी सायंकाळी ७.०० ते ७.३० या दरम्यान घेणार आहे. असे मनपाचे प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविण्यात येत आहे.