विद्यापीठाची हिवाळी-2024 एम.एस्सी. सेमि.1 बॉटनी अभ्यासक्रमाची पुनर्परीक्षा 5 फेब्राुवारी रोजी होणार विद्याथ्र्यांनी नोंद घेण्याचे विद्यापीठाचे आवाहन

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची हिवाळी-2024 एम.एस्सी. सेमिस्टर-1 (बॉटनी) (एन.ई.पी.) (जुना अभ्यासक्रम) अभ्यासक्रमातील बॉट101 सेल अॅन्ड मॉलेक्युलर बॉयलॉजी या विषयाच्या परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिकेच्या एकुण गुणांमध्ये तफावत असल्याबाबतची तक्रार विद्यापीठाकडे प्राप्त झाली होती. विद्यापीठ प्राधिकारिणीने घेतलेल्या निर्णयानुसार सदर विषयाची पुनर्परीक्षा बुधवार दि. 5 फेब्राुवारी, 2025 रोजी सकाळी 9.00 ते दु. 12.00 या वेळेत विद्याथ्र्यांना यापूर्वीच देण्यात आलेल्या परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे.
सदर परीक्षेच्या वेळी विद्याथ्र्यांनी त्यांना देण्यात आलेले प्रवेशपत्र सोबत आणावे, असे परीक्षा विभागाकडून कळविण्यात आले आहे. तसेच यासंदर्भात सर्वसंबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य, केंद्राधिकारी, महाविद्यालये, परीक्षा केंद्रांना कळविण्यात आले असून महाविद्यालयांनी तातडीने आपल्या विद्याथ्र्यांना कळवावे आणि काही अडचण असल्यास परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी यांच्याशी 9850042357 या क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे विद्यापीठाच्यावतीने कळविण्यात येत आहे.