विद्यापीठ परिसरातील वनस्पती व प्राणी सर्वेक्षण महत्वाचे – कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ परिसरात विविध वनस्पती व प्राणी अस्तित्वात असून या जैवविविधतेचे सर्वेक्षण करुन त्याचे संवर्धन करणे महत्वाचे आहे. विद्याथ्र्यांच्या सहभागाने होणारे सर्वेक्षण त्यानंतर त्याचे कलेक्शन, कॉपी बुक टेबलच्या रुपाने पूर्णत्वास येणार असल्यामुळे विद्याथ्र्यांच्या अभ्यासाकरीता तसेच पर्यावरण संरक्षणासाठी महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी केले. विद्याथ्र्यांना जैवविविधतेचे महत्व समजावून देणे आणि त्यांच्यातील कौशल्य विकसित करणे, या मुख्य उद्देशावर आयोजित जैवविविधता सर्वेक्षण कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी कुलगुरू बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाच्या सल्लागार समितीचे सदस्य डॉ. अनंत मराठे, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे व जीवतंत्रशास्त्र विभागातील डॉ. अनिता पाटील उपस्थित होते.
कुलगुरू पुढे म्हणाले, महत्वपूर्ण असलेल्या विषयावरील कार्यशाळेमध्ये विद्याथ्र्यांनी स्वत: पुढाकार घेवून सहभाग नोंदविला आहे. 450 एकराच्या विस्तीर्ण सुंदर परिसरामध्ये विविध प्रकारचे प्राणी व वनस्पती आहेत. या सर्वांची माहिती एकत्रित व्हावी, पुस्तकाच्या रुपाने ती तयार व्हावी आणि ती तयार करण्यामध्ये विद्याथ्र्यांचा सहभाग असावा, याकरीता हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. विद्याथ्र्यांनी या उपक्रमामध्ये सहभागी होवून संशोधन केल्याबद्दल दोन क्रेडीट व सर्टिफिकेट सुद्धा दिले जाणार आहे. वेगवेगळ्या ऋतुमधील प्राणी व वनस्पती यांची माहिती विद्याथ्र्यांमार्फत फोटोसह गोळा होणार असल्यामुळे नवनवीन वनस्पती व प्राण्यांची माहिती उपलब्ध होईल.
हवामान बदलाचा अभ्यास सुद्धा यानिमित्ताने विद्याथ्र्यांमार्फत होणार असल्यामुळे पर्यावरण संवर्धनासाठी सुद्धा सर्वेक्षण उपयुक्त ठरेल. विद्याथ्र्यांनी सतत निरीक्षण करुन समाजातील समस्यां सोडवाव्यात, त्यावर संशोधन करावे, असा उपदेशही कुलगुरूंनी यावेळी केला.
विद्याथ्र्यांनो ! समस्या सोडविणारे व्हा – डॉ. अनंत मराठे
विद्याथ्र्यांना संबोधित करतांना डॉ. मराठे म्हणाले, आजचा युवक 21 व्या शतकातील आहे. विद्याथ्र्यांकडून समाजाच्या अनेक अपेक्षा आहेत. उच्च शिक्षणातील जी.ई.आर. वाढविण्याचे आव्हानसुद्धा शिक्षण क्षेत्रासमोर आहे. त्यामुळे वि·ाविद्यालयातून बाहेर पडणारा विद्यार्थी वै·िाक जबाबदारी स्वीकारणारा तयार व्हायला पाहिजे. जगात अनेक समस्यां आहेत, त्या सोडविण्यासाठी विद्याथ्र्यांनी पुढे येणे आवश्यक आहे. याकरीता विद्याथ्र्यांना प्रश्न पडायला हवेत, त्याने सतत बारकाईने निरीक्षण करायला हवे. प्रश्न पडल्यानंतर त्या समस्यां कशा सोडविता येईल, त्यावर उपाय कसा देता येईल, यासाठी आमचा विद्यार्थी सदैव तयार असला पाहिजे. प्राणी व वनस्पती या जैवविविधतेचे सर्वेक्षण होवून कॉपी बुक टेबल विद्यापीठाच्यावतीने तयार होणार असल्यामुळे भविष्यातील संशोधनासाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. याकरीता शिक्षक व विद्याथ्र्यांनी खूप मेहनत घ्यावी, असे आवाहन सुद्धा त्यांनी याप्रसंगी केले.
प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे म्हणाले, कुलगुरूंच्या नवकल्पनेतून जैवविविधता सर्वेक्षण कार्यशाळा घेण्यात येत असून निश्चितच दिशादर्शक असे पाऊल आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीचा भाग म्हणून कार्यशाळेचे वेगळे महत्व आहे. विद्याथ्र्यांनी यानिमित्ताने सूक्ष्म संशोधनपर अभ्यास करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
राष्ट्रगीत, विद्यापीठ गीत व महाराष्ट्र गीताने कार्यशाळेची सुरुवात झाली. संत गाडगे बाबा व माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. अनिता पाटील, संचालन डॉ. हेमलता नांदुरकर, तर आभार डॉ. वैशाली धनविजय यांनी मानले. कार्यशाळेला बॉटनी विभागप्रमुख डॉ. वर्षा नाठार, प्रशांत गावंडे, महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, वरुडचे प्राचार्य डॉ. दिलीप हांडे, जैवविविधता तज्ज्ञ डॉ. जयंत वडतकर, डॉ. सुरेंद्र माणिक, माजी प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर, केमटेक विभागप्रमुख डॉ. अनिल नाईक, डॉ. गजानन मुळे, न.न.सा. संचालक डॉ. अजय लाड, इन्क्युबेशन सेंटरच्या प्रमुख डॉ. स्वाती शेरेकर, डॉ. प्रशांत ठाकरे यांचेसह सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.