विद्यार्थ्यांनी समाजकार्याच्या उपक्रमातून शिक्षणाची कास धरावी

७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने रविवार २६ ला वडाळी देशमुख येथील दुर्गा माता मंदिर चौकात माळी महासंघ नवंदुर्गा महिला बचत गट व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे वतीने गुणवंत विद्यार्थी आई-वडिलांसह सत्कार सोहळ्याचे आयोजन मोठ्या थाटात संपन्न झाले असता या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे किशोर जुनघरे अकोट ग्रा. पो. स्टेशनचे पोलीस निरीक्षक व हिम्मत दंदी अकोट शहर सहा. पो.उपनिरीक्षक व विशेष उपस्थिती प्रवीण शिंगाडे सरपंच ,प्रमोद खलोकार उपसरपंच, देवानंद झाडे मुख्याध्यापक, भास्कर इंगळे मुख्याध्यापक उपस्थिती होते
सर्वप्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या फोटो प्रतिमेचे हार अर्पण करून पूजन करण्यात आले व तदनंतर सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन केले , किशोर जुनघरे पो. निरीक्षक यांनी विद्यार्थी देशभक्ती सामाजिक कार्याच्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे त्यांच्या शिक्षणाला प्रेरित करून त्यांना अभ्यासू ऊर्जा निर्माण करून शिक्षण प्रगतीची प्रवृत्ती घडवून आणणे व त्यांना शालेय साहित्य वाटप करून त्यांच्यात अभ्यासाची गोंडी निर्माण करणे अशा या स्तुत्य उपक्रमातून विद्यार्थ्यांनी शिक्षण प्रगतीची कास धरावी असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले , हिम्मत दंदी सर यांनी अत्यंत गरीब हालाखीच्या परिस्थितीमधून ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना प्रत्येक पाऊल हे जोखीम रिक्स घेऊन शिक्षण करावे लागते अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून त्यांना मदतीचा हात देणे हे प्रजासत्ताक दिनानिमित्त भविष्य घडव्याला अनमोल कार्य ठरते असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतेवेळी बोलत होते,
गुणवंत सत्कार सोहळ्यामध्ये किशोर जुनघरे पो.नि. यांचा शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन पवन बेलसरे यांनी सत्कार केला व हिम्मत दंदी यांचा शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन दीपक खलोकार यांनी सत्कार केला, प्रवीण शिंगाडे सरपंच रवींद्र घाटोळ यांनी सत्कार केला प्रमोद खलोकार प्रकाश वाहूरवाघ यांनी सत्कार केला,
तर श्रीमती लक्ष्मीबाई गणगणे विद्यालयातील ओवी विष्णू चौधरी, सृष्टी आशिष बारब्बंदे , वेदांती राजेंद्र शेंडे, सिद्धता श्रीधर राजनकर ,समृद्धी अनिल काकड, ईश्वरी गोपाल काळे या गुणवंत विद्यार्थ्यांचा मंचकावर आई-वडिलांसह सत्कार सन्मानचिन्ह शालेय उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले,जि. परिषद शाळेमध्ये एक ते सात वर्गांमधील विद्यार्थ्यांना शाळेचे शूज स्कूलबॅग टिफिन डबा कंपास पेन व रजिस्टर अशा उपयुक्त साहित्यांचे वाटप करण्यात आले यावेळी पत्रकार अरुण काकड, रविराज मोरे ,धनु बायवार, अभिजीत सोळुंके, इतरही पत्रकारांचा सहभाग लागला दत्तात्रय पेटे ,उमेश बोरोडे, कृष्णा रेवस्कर, विद्याधर घाटोळ, गोपाल धनोकार, संदीप पेटे, अंकुश काळे, सचिन अडोकार, उमेश वरेकार, वसंता पिंपळे, निलेश पेटे आनंद बोरोडे , आयुष हुशे कार्यक्रमाची सूत्रसंचालन पत्रकार चंचलताई पितांबरवाले तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन पत्रकार पवन बेलसरे यांनी केले नवदुर्गा बचत गटाच्या सर्व महिलांनी उपस्थिती लावली,