शिवसेना वसाहत अकोला येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजlरोहन

अकोला -शिवसेना वसाहत अकोला येथे 76 वा प्रजासत्ताकदिन ध्वजlरोहन व भारत माता पूजन करून संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष आपला माणूस डॉ अशोक ओळंबे तर प्रमुख अतिथी डॉ शोभा पांडव यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ अशोक ओळंबे याचे हस्ते दीपप्रज्वलीत करून भारत माता पूजन करण्यात आले तर डॉ शोभा पांडव यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. डॉ अशोक ओळंबे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणlत 28 वर्षेपासुन शिवसेना वसाहत येथील शिवसेनेश्वर मंदिराच्या प्रांगणात गणेश पोलाखडे मित्र मंडळ व शिवसेना वसाहत येथील नागरिक 15 ऑगस्ट 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस भारत माता पूजन हे राष्ट्रीय सण मोठ्या उत्सवात व थाटात साजरा करतात ज्यामध्ये गरिब विध्यार्थ्यांना वह्या पुस्तके पेन पेन्सिल वाटप, रक्तदान शिबीर, वृक्षारोपण आरोग्य शिबीर राबविले जातात याबद्दल शिवसेना वसाहत येथील गणेश पोलाखडे मित्र मंडळ व नागरिकांचे कौतुक करून सर्वांना डॉ अशोक ओळंबे यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे आयोजन गणेशराव पोलाखडे मित्र मंडळ यांचे वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक सागर पोलाखडे संचालन गणेशराव मानकर तर उपस्थित मान्यवरांचे आभार संतोष चाटी यांनी मानले कार्यक्रमाला रामचंद्र धनभर सुदामराव भगत गणेश मानकर कैलास भुसारी बाळू चव्हाण शिवम भडांगे सागर पोलाखडे संतोष चाटी विक्की पोलाखडे मयूर सुलताने संतोष बुरडे नरेंद्र मंडाळे संतोष पोंधे गौरव सोनागरे राहुल चहाजगुणे सागर खारोडे यांचेसह मोठ्या संख्येने शिवसेना वसाहत मधील नागरिकांची उपस्थिती होती.