LIVE STREAM

Latest NewsMaharashtra

सिद्धीविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू, अंगभर कपडे घालून आला तरच प्रवेश

गणेशभक्तांचे आराध्यदैवत असलेल्या सिद्धीविनायक मंदिरासंबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईतील सुप्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. ड्रेसकोड संदर्भातलं सिद्धीविनायक मंदिर न्यासाकडून अधिकृत पत्रक जारी करण्यात आलं आहे. सिद्धीविनायक मंदिरात येणाऱ्या भाविकांनी आता भारतीय पारंपरिक वेशभूषा किंवा अंगभर कपडे घातले पाहिजे तरच त्यांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश देण्यात येणार असल्याचं पत्र मंदिर न्यासाकडून प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

सिद्धीविनायक मंदिरातील प्रवेशासाठीचा हा ड्रेसकोड पुढच्या आठवड्यापासून लागू करण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे सदस्य राहुल लोंढे यांनी दिली.

अनेक भाविकांकडून या आधी तक्रारी
सिद्धीविनायक मंदिरात देशभरातून रोज हजारो भाविक येत असतात. त्यामध्ये अनेकांचा पेहराव हा इतरांना संकोच वाटणारा ठरतोय अशा तक्रारी सातत्याने होत होती. त्यामुळेच सिद्धीविनायक मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात यावा अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. अनेक भाविकांनीही त्यापद्धतीचे मत मांडलं होतं. या सगळ्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याचं ट्रस्टकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

सिद्धिविनायक मंदिरात येणारा भक्ताचा पेहराव हा पावित्र्य जपणारा असावा. जो पेहराव कराल तो दुसऱ्याला संकोच वाटणारा नसावा. यापुढे समोरच्याला संकोच वाटेल असा पेहराव असेल त्यांना न्यासाकडून प्रवेश दिला जाणार नाही याची नोंद भाविकांनी घ्यावी. म्हणजेच समोरच्या लोकांना लाजवतील किंवा त्यांना संकोच वाटेल अशा कपड्यांवर आणि तोकड्या कपड्यांवर बंदी असणार आहे असं ट्रस्टच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.

शॉर्ट्स परिधान करणाऱ्यांना प्रवेश बंदी
माघी गणेश जयंतीच्या निमित्ताने सिद्धीविनायक मंदिरात मोठा उत्सव साजरा केला जातो. त्याच पार्श्वभूमीवर ट्रस्टच्या सदस्यांची बैठक झाली आणि त्यामध्येच एकमताने हा निर्णय घेण्यात आला. जे पुरुष किंवा महिला भाविक शॉर्ट्स कपड्यांमध्ये सिद्धीविनायक मंदिरात येतात त्यांना आता प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

ज्या महिला किंवा मुली ज्या शॉर्ट्स कपड्यांमध्ये येतात त्यांना प्रवेश दिला जाणार नाही. मंदिरातील पावित्र्य राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!