स्व. भैय्यासाहेब ठाकूर यांच्या जयंतीदिनी रक्तदानाचा महाकुंभ
https://city24.news/2025/01/28/स्व-भैय्यासाहेब-ठाकूर-या/
सर्वासामान्य, गोरगरीब, शेतकरी, शेतमजूरांसाठी आपले जीवन वेचणारे माजी आमदार, लोकनेते स्व.भैय्यासाहेब ठाकूर यांची जयंती तसेच स्व. कुमारसाहेब ठाकूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी (ता.२८) आयोजित रक्तदान शिबिरात अवघ्या काही तासांतच २७० पेक्षा अधिक युनिट रक्ताचे संकलन झाले.
विशेष म्हणजे भैय्यासाहेबांच्या कन्या, महाराष्ट्राच्या माजी मंत्री अॅड. यशोमती ठाकूर तसेच आकांक्षा ठाकूर यांनी सुद्धा रक्तदान करित स्व. भैय्यासाहेबांना आदरांजली वाहिली.
लोकनेते स्व. भैय्यासाहेब ठाकूर यांच्या जयंतीदिनाचे औचत्य साधून श्री. रामचंद्र युवक कल्याण संस्था, मोझरी तसेच अॅड. यशोमती ठाकूर मित्रमंडळाच्या वतीने भैय्यासाहेब ठाकूर यांचे समाधीस्थळ शिंदी पांडी पंचधारा मोझरी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे सकाळी ९ ला रक्तदान शिबिर सुरू झाल्यानंतर काही तासांतच २७० युवकांनी रक्तदान करित भैय्यासाहेबांना आदरांजली दिली. शहर तसेच जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची गरज निर्माण झाली असून रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे या उद्देशाने अॅड. यशोमती ठाकूर यांच्या सूचनेनुसार पदाधिकाऱ्यांनी रक्तदान शिबिर आयोजित केले होते. खासदार बळवंत वानखडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप, अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश मोरे, जिल्हापरिषदेचे माजी सभापती बाळासाहेब हिंगणीकर, माजी सभापती जयंतराव देशमुख, श्रीकांत बोंडे, रमेश काळे, सतीश पारधी, अमित गावंडे, वैभव वानखडे, पंकज देशमुख, प्रद्युम्न पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी रक्तदान शिबिराला भेट देत रक्तदात्यांचा उत्साह वाढविला तसेच लोकनेते भैय्यासाहेब ठाकूर यांना आदरांजली वाहिली. या रक्तदानाच्या या महाकुंभात जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक सहभागी झाले होते.
रक्तदान हेच जीवनदान
वेळेवर रक्त मिळाल्याने अनेक रुग्णांचे प्राण वाचविले जावू शकते. रक्ताची अडचण लक्षात घेता कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी अधिकाधिक संख्येने रक्तदान करण्याची गरज यावेळी माजी मंत्री अॅड. यशोमतीताई ठाकूर यांनी व्यक्त केली. त्याला कार्यकर्त्यांनी उत्सफुर्त प्रतिसाद दिला.