LIVE STREAM

Crime NewsInternational NewsLatest News

धक्कादायक! १७ वर्षांच्या मुलीला अमली पदार्थांचे व्यसन लावून महिला करवून घेत होती ‘हे’ विकृत काम

 पंजाबमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इसे खान मसितान रोड येथे राहणाऱ्या किशोरवयीन मुलीने तिला नशेच्या आहारी ढकलून 

वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले होते, असे सांगितले. मुलीने न लाजता तिला वेश्याव्यवसायात कसे ढकलले गेले या गोष्टी सांगितल्यावर उपस्थित सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी समितीच्या वतीने काल नगरात मार्च काढण्यात आला. यावेळी समितीचे अध्यक्ष सुखदीप सिंग यांना मार्चच्या वाटेवर एक मुलगी खाली बसून भोजन करताना दिसली. सुखदीप सिंह यांनी सांगितले की, मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. अशा स्थितीत तीच्याशी बोलल्यानंतर तीला तीच्या घरी नेण्यात आले. त्यांनी सांगितले की, मुलीशी बोलले असता तिला गेल्या दोन वर्षांपासून ड्रग्जचे व्यसन लागल्याचे समजले.
मुलीची चौकशी केली असता तीने सांगितले की, मनजीत कौर नावाच्या महिलेने तिला अंमली पदार्थांचे इतके वाईट व्यसन लावले की ती म्हणू लागली, “मला नशेसाठी फक्त सहा कॅप्सूल हवे आहेत आणि त्यानंतर मला कोणी काही केले तरी मला पर्वा नाही.” शिवाय आता तिला नशेचे व्यसन पूर्ण करण्यासाठी वेश्याव्यवसाय करण्यास ती तयार असल्याचेही तिने सांगितले. या महिलेकडे तिच्यासारख्या अनेक मुली आहेत, ज्यांच्यासोबत ती वेश्याव्यवसाय चालवते, असा दावाही तिने केला आहे.
मुलीने सुखदीप सिंग यांना सांगितले की, पूर्वी तिची कमाई सहा ते सातशे रुपये होती. पण आता ती फक्त तीनशे रुपये आहे. अशा स्थितीत तीला त्यातील अर्धे म्हणजे १५० रुपये मिळतात. जे तीचे व्यसन भागवण्यासाठी पुरेसे आहेत. या मुलीने सांगितले की, जेव्हा तिला नशेसाठी कॅप्सूल मिळत नाही तेव्हा ती सरकारी रुग्णालयातून उपलब्ध असलेल्या बुप्रेमॉर्फिनच्या गोळ्या पाण्यात मिसळून इंजेक्शन घेते. मुलीच्या म्हणण्यानुसार, ती १७ वर्षांची आहे, तिला एक बहीण आणि भाऊ देखील आहे. त्यांच्या वडिलांचे निधन झाले आहे.
व्यसनमुक्ती केंद्रात भरती
अमली पदार्थ विरोधी समितीने मुलीला पोलीस ठाण्यात नेऊन तक्रार दाखल केली. या तरुणीला जानेर गावातील व्यसनमुक्ती केंद्रातही दाखल करण्यात आले. हा प्रकार थांबवून लवकरात लवकर कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!