Latest NewsNagpur
नागपुरात अवैध दारू तस्करीवर पोलिसांची मोठी कारवाई! ६.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त

नागपुरात अवैध दारू तस्करी करणाऱ्यांविरोधात पोलिसांची मोठी कारवाई! गुन्हेशाखा युनिट ३ ने जरीपटका भागात सापळा रचत विदेशी दारूची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. ६.५३ लाखांचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला आहे. पाहुयात ही संपूर्ण बातमी..."
"दिनांक २८ जानेवारी रोजी नागपूर शहरातील गुन्हेशाखा युनिट ३ च्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की, साई मंदिर चौक, जरीपटका येथे एका टाटा पंच गाडीतून मोठ्या प्रमाणात विदेशी दारूची वाहतूक होत आहे. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयित वाहनाला थांबवले.
गाडीची झडती घेतल्यावर पोलिसांना ओ.सी. ब्ल्यू व रॉयल स्टॅग या ब्रँडच्या विदेशी दारूचे ६ बॉक्स मिळाले. प्रत्येक बॉक्समध्ये ४८ बाटल्या असल्याने मोठ्या प्रमाणावर दारूचा साठा हस्तगत करण्यात आला. पोलिसांनी वाहनचालक अमर सुनके व राकेश चंदेल यांना ताब्यात घेतले.
पोलिसांच्या चौकशीत त्यांनी उघड केले की, हा माल अविनाथ नवरखेडे याच्या आदेशानुसार नागपूरच्या ओका बार अँड रेस्टॉरंटमधून आणला जात होता. पोलिसांनी ६.५३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींना जरीपटका पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. तसेच, प्रमुख सूत्रधार अविनाथ नवरखेडे व बार मालकाविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे."
"नागपूर पोलिसांनी अवैध दारू विक्रीचा मोठा पर्दाफाश केला आहे. आरोपींविरोधात कडक कारवाईची मागणी होत आहे. आता पाहावे लागेल की, मुख्य सूत्रधार कधी पोलिसांच्या जाळ्यात अडकतो.