नागपूर पोलिस मुख्यालयातील कर्मचाऱ्याची आत्महत्या!
“नागपूर पोलिस मुख्यालयातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका पोलिस कर्मचाऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. बर्खास्तगीच्या नोटिशीमुळे मानसिक तणावात असलेल्या या कर्मचाऱ्याने टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे. यामुळे पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे…” नागपूर पोलिस मुख्यालयात कार्यरत रामचंद्र नानाजी रोहनकर यांनी आज सकाळी स्वतःला संपवले. १० दिवसांपूर्वी त्यांना बर्खास्तगीचा नोटीस मिळाला होता, ज्यामुळे ते मानसिक तणावात होते. त्यांच्या घरच्यांनी सांगितले की, नोटिशीनंतर ते सतत चिंतेत राहायचे. आज अचानक त्यांनी विष घेतल्याची माहिती मिळताच त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या अशा आकस्मिक जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर नागपूर पोलिस दलात चिंतेचे वातावरण आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याचा सखोल तपास करण्याचे आदेश दिले आहेत.
“ही घटना पोलिस दलासाठी मोठा धक्का आहे. आपल्या सहकाऱ्याने आत्महत्या केल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मानसिक तणाव व कामाचा दबाव यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. पुढील तपासानंतरच या घटनेची खरी कारणे स्पष्ट होतील..