महानगरपालिका उच्च प्राथमिक मराठी शाळेत स्नेहसंमेलन व खेळ पैठणीचा कार्यक्रम

महानगरपालिका उच्च प्राथमिक मराठी शाळा क्रमांक 15 ,SRPFकॅम्प अमरावती .येथे आज दिनांक 27 जानेवारी 2025 ला स्नेहसंमेलन व खेळ पैठणीचा कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मा.एम राकेश जी कलासागर (समादेशक एस आर पी एफ कॅम्प) तसेच मा.कराडे साहेब (सहाय्यक समादेशक एस आर पी एफ कॅम्प) मा.श्री प्रकाशजी मेश्राम (शिक्षणाधिकारी मनपा) मा.आशिष भाऊ गावंडे (माजी शिक्षण सभापती )मा.शेख साहेब (पोलीस निरीक्षक )मा. कालसर्फे साहेब (पोलीस निरीक्षक) तसेच डॉ.माणसा कलासागर मॅडम व जेसीआय गोल्डन अमरावतीचे अध्यक्ष चिंतन जी पासद व जेसीआय गोल्डन मेंबर उपस्थित होते ,शाळा निरीक्षक वासनिक मॅडम, शाळा निरीक्षक बनसोड मॅडम ,शाळा निरीक्षक योगेश पखाले सर ,केंद्र समन्वयक नीलिमा गुल्हाने मॅडम शाळेचे माजी मुख्याध्यापक झोड सर उपस्थित होते. खेळ पैठणीचा या खेळामध्ये महिला पालकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला आणि त्यातून तीन विजेत्या महिलांना पैठणीचे वाटप मा.माणसा कलासागर मॅडम व जेसीआय गोल्डन चे मेंबर यांच्याद्वारे करण्यात आले तसेच संपूर्ण विद्यार्थ्यांना बक्षीसे वाटप करण्यात आले. त्याच दरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांनी व नर्सरी व केजीच्या विद्यार्थ्यांनीही खूप सुंदर असे नृत्य सादर केले यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ .प्रीती खोडे मॅडम शाळेतील शिक्षक कु. प्रियंका हंबर्डे व श्री. योगेश ताटे यांनी तसेच नर्सरी टीचर राणीकर मॅडम श्रद्धा बडे मॅडम आणि जयश्री मे टांगे मॅडम यांनी खूप परिश्रम घेतले