येळकोट येळकोट च्या जयघोषात कामठा येथील खंडोबा यात्रा उत्साहात संपन्न!
श्रोतृहो, महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरेचा अभिमान असलेली कामठा येथील खंडोबा यात्रा यंदाही भव्यदिव्य स्वरूपात पार पडली आहे. या यात्रेत महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून हजारो भाविकांनी मोठ्या श्रद्धेने उपस्थिती दर्शवली आहे.
अर्धापूर तालुक्यातील कामठा गावात दरवर्षी भरणारी खंडोबा यात्रा शेकडो वर्षांची परंपरा असलेली आहे. या यात्रेला मोठा ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व आहे. या जत्रेची सुरुवात खंडोबा देवाच्या मंदिरात महापूजेनंतर पालखीनं होते. “येळकोट येळकोट जय मल्हार!” च्या घोषात खंडोबा देवाची पालखी वाजत-गाजत मिरवणुकीने गावभर फिरते. पालखीच्या समोर भक्त खारीक, खोबरं आणि हळदीचा भंडारा उधळतात. विशेष म्हणजे, वाघ्या-मुरळी आणि वारूळ हातावर वार झेलत या यात्रेत भक्तीभावाने सहभागी होतात.
महाराष्ट्रातील माळेगाव यात्रेनंतर ही सर्वात मोठी खंडोबा यात्रा मानली जाते. यात्रेत कुस्ती स्पर्धा, शंकर पट आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम भरवले जातात. या पवित्र ठिकाणी नवस बोलणारे भाविक नवस फेडण्यासाठी मोठ्या संख्येने हजेरी लावतात. तर पाहिले तुम्ही कामठा खंडोबा यात्रेचा हा भव्य सोहळा! श्रद्धा, परंपरा आणि भक्ती यांचा सुंदर संगम या यात्रेत पाहायला मिळतो. महाराष्ट्राची ही संस्कृती आणि समृद्ध परंपरा कायम यशस्वी होवो, याच शुभेच्छा