AmravatiLatest NewsLocal News
26 व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ स्पोर्टस् मीट क्रीडा महोत्सवाकरीता विद्यापीठाचे संघ जाहीर

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे 18 ते 22 फेब्राुवारी, 2025 दरम्यान होणा-या 26 व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ स्पोर्टस् मीट क्रीडा महोत्सवाकरीता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे संघ घोषित करण्यात आले आहे.
अॅथलेटिक्स (पुरुष व महिला) संघाच्या चमूंचा प्रशिक्षण वर्ग विद्यापीठाच्या क्रीडा संकुलावर होणार असून बास्केट बॉल (पुरुष व महिला), कबड्डी (महिला व पुरुष), व्हॉलिबॉल (महिला व पुरुष) संघाच्या चमूंचा प्रशिक्षण वर्ग डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावती येथे, खो-खो (पुरुष व महिला), बुध्दीबळ (पुरुष व महिला) संघाच्या चमूंचा प्रशिक्षण वर्ग श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावती, टेबल टेनिस (पुरुष व महिला) आणि बॅडमिंटन (पुरुष व महिला) संघाच्या चमूंचा प्रशिक्षण वर्ग विद्याभारती महाविद्यालय, अमरावती येथे दि. 6 ते 15 फेब्राुवारी दरम्यान होणार आहे. प्रशिक्षण वर्गाला सर्व संघाच्या चमूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाच्या संचालक डॉ. तनुजा राऊत यांनी केले आहे.