अमरावतीतील शिवशाही बस फेल, प्रवाशांचे हाल

अमरावती शहरातील प्रवाशांसाठी आजचा दिवस अडचणींचा ठरला. मुख्य बस स्थानक आगारातून सुटलेली शिवशाही बस (MH 09 EM 1627) अचानक फेल झाली, आणि यामुळे राजकमल चौकात मोठी वाहतूक कोंडी झाली. प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. या घटनेने पुन्हा एकदा एमएसआरटीसीच्या तांत्रिक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
“अमरावती शहरात एमएसआरटीसीच्या शिवशाही बसचा प्रवास आज त्रासदायक ठरला. मुख्य बस स्थानकातून सुटलेल्या MH 09 EM 1627 या बसचा अचानक गेअर बॉक्स बंद पडल्याने बस राजकमल चौकात फेल झाली. या घटनेमुळे वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली आणि प्रवाशांना प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागले.
वाहतूक पोलिस आणि कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे अनुचित घटना टळली बस नागरिकांनी धक्का देऊन साईडला लावण्यात आली, ज्यामुळे वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू होऊ शकली. मात्र, वारंवार होणाऱ्या या तांत्रिक समस्यांमुळे महामंडलच्या बस व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत अधिकाऱ्यांना कोणतेही गांभीर्य नाही का? अशी विचारणा आता होत आहे. अशा भंगार बसेस रस्त्यावर धावणे म्हणजे प्रवाशांच्या जीवाशी खेळ नाही का? ही परिस्थिती आणखी किती काळ चालणार, हा मोठा प्रश्न आहे. प्रशासनाने यावर लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवासी करत आहेत.”
“तर पाहिलंत, अमरावती शहरात पुन्हा एकदा शिवशाही बसची तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. वारंवार अशा घटना घडत असताना एमएसआरटीसी प्रशासन झोपेत आहे का? हा प्रश्न नागरिक विचारत आहेत. प्रशासनाकडून यावर काय पावले उचलली जातात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.