अमरावती महानगरपालिकेतर्फे महात्मा गांधी यांना विनम्र अभिवादन शहिदांना श्रध्दांजली अर्पण

गुरुवार दिनांक ३० जानेवारी,२०२५ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी निमीत्य मा.आयुक्त सचिन कलंत्रे यांच्या हस्ते महात्मा गांधीच्या प्रतिमेस हारार्पण करण्यात आले. त्यानंतर महानगरपालिकेच्या प्रांगणात अधिकारी, कर्मचारी व नागरीक यांनी शहिदांना दोन मिनिटे मौन पाळून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
नागरीकांना मौन पाळून श्रध्दांजली अर्पण करण्याकरीता सुचना म्हणून महानगरपालिकेने सकाळी १०.५९ ते ११.०० वाजेपर्यंत मौन पाळण्याबाबत सायरन वाजविण्यात आला तसेच मौन सोडण्याकरीता पुन्हा ११.०२ ते ११.०३ ला सायरन वाजविण्यात आला. या कार्यक्रमानंतर जयस्तंभ चौक येथील महात्मा गांधीच्या पुतळ्यास हार्रापण करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, उपायुक्त योगेश पिठे, उपायुक्त डॉ.मेघना वासनकर, उपायुक्त नरेंद्र वानखडे, शहर अभियंता ईश्वरनंदा पनपालिया, मुख्यलेखापरिक्षक श्यामसुंदर देव, मुख्यलेखापाल दत्तात्रय फिस्के, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, सिस्टीम मॅनेजर अमित डेंगरे, कार्यकारी अभियंता रविंद्र पवार, उद्यान अधिक्षक श्रीकांत गिरी, कार्यालय अधिक्षक नंदकिशोर पवार, उपअभियंता विवेक देशमुख, वैद्यकीय अधिकारी डॉ.संदिप पाटबागे, वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रतिभा आत्राम, महानगरपालिका संघटनेचे सरचिटणीस प्रल्हाद कोतवाल, अधिकारी, कर्मचारी, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.