LIVE STREAM

AmravatiLatest NewsLocal News

नवसारी, वेलकम पॉईंट, अंबादेवी परिसर, शंकर नगर, राजकमल चौक, गांधी चौक परिसरात उपायुक्‍त डॉ.मेघना वासनकर यांनी दिली भेट

     अमरावती महानगरपालिका उपायुक्‍त डॉ.मेघना वासनकर यांनी आज दिनांक ३० जानेवारी,२०२५ रोजी नवसारी, वेलकम पॉईंट, अंबादेवी परिसर, शंकर नगर, राजकमल चौक, गांधी चौक परिसरात भेट दिली. सदर परिसरातील साफ सफाईच्या कामाचा आढावा घेवून स्‍वच्‍छतेच्‍या कामाची पाहणी केली. सदर परिसर साफसफाई व स्वच्छता पूर्ण करावी तसेच अनधिकृत पोस्टर्स, बॅनर्स हटविण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी दिले. या पाहणी दरम्‍यान उपायुक्‍त डॉ.मेघना वासनकर यांनी नागरिकांशी संवाद साधुन त्‍यांच्‍या समस्‍या यावेळी जाणून घेतल्‍या.
      उपायुक्त डॉ.मेघना वासनकर यांनी स्वत:ही फिरून प्रत्यक्ष परिस्थिती बघितली व यंत्रणेला गतीमान केले. संबंधित स्वास्थ निरीक्षकाला परिसरातील संपूर्ण स्वच्छता करण्याचेही निर्देश यावेळी देण्यात आले. सदर परिसरातील कचरा साफ करण्‍याची कार्यवाही करण्‍यात आली. सदर परिसरात अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई उपायुक्त डॉ.मेघना वासनकर यांच्‍या उपस्थितीत आज सदर परिसरात अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करण्यात आली. परिसरातील दुकानदाराने दुकानाबाहेर अतिक्रमण करु नये तसेच नालीवर कोणीही दुकान लावू नये असे सक्‍त निर्देश यावेळी त्यांनी दिले. शहरातील अतिक्रमण, पदपथांवर मुक्काम ठोकणारे फिरस्ते आणि अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून संयुक्त कारवाई केली जात आहे. विनापरवाना बांधकाम साहित्य रस्त्यावर ठेवून रहदारीला अडथळा करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश यावेळी उपायुक्‍त डॉ.मेघना वासनकर यांनी संबंधित यंत्रणेला दिले. पाहणी दरम्‍यान प्रत्‍येक हॉकर्सची भेट घेवून त्‍यांच्‍याशी चर्चा केली. या परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर महापालिका धडक कारवाई करत आहे. सदर हॉकर्सची तपासणी करुन त्‍यांच्‍याकडून प्‍लास्‍टीक पन्‍नी आढळून आल्‍यास सदर हॉकर्सला दंड करण्‍याचे निर्देश त्‍यांनी दिले. सदर ठिकाणी हॉकर्सकडे डस्‍टबीन न आढळून आल्‍यास  सदर हॉकर्सवर दंड आकारण्‍याची कार्यवाही करण्‍याचे निर्देश यावेळी उपायुक्‍त महोदयांनी दिले.      
      या भेटी दरम्‍यान सहाय्यक आयुक्‍त भुषण पुसतकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.अजय जाधव, उद्यान अधिक्षक श्रीकांत गिरी, बाजार परवाना अधिक्षक उदय चव्‍हाण, अतिक्रमण पथक प्रमुख श्‍याम चावरे, स्‍वास्‍थ अधिक्षक श्रीकांत डवरे, स्‍वास्‍थ निरीक्षक, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी, मनपा कर्मचारी उपस्थित होते.
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!