महात्मा गांधी यांना पुण्यतिथी निमित्य काँग्रेस सेवादला तर्फे विनम्र आदरांजली

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्य 30 जानेवारी सकाळी 11वाजता जयस्तभ चौक येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादला चे सरचिटणीस अभिनंदन पेंढारी यांनी आदरांजली अर्पण करण्याचे आयोजन केले होते. शहीद दिनानिमित्त याप्रसंगी अभिनंदन पेंढारी व पुरुषोत्तम मुंदडा यांनी महात्माजीच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी दिपक हुंडीकर, सुरेश रतावा, मुकेश छागाणी, मनिष पावडे, विजय बर्वे, रशीदभाई, महेंद्र देशमुख, अरुण बनारसे, अनिल तायडे, अनिल जोशी उपस्थित होते यावेळी पुरुषोत्तमजी मुंदडा यांनी आपल्या भाषनातून सांगितले की राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विचार व त्यांनी दिलेला सत्य v अहिंसा या मंत्रावर सर्वानी आचरण करून विश्व्शांतीसाठी सर्वानी कटीबद्ध व्हावे. शेवटी दोन मिनिट मौन पाळून सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली कार्यक्रमाचे संचालन अभिनंदन पेंढारी तर आभार दिपक हुंडीकर यांनी मानले