आईच तिच्या मित्राला माझ्यासोबत…” १५ वर्षांच्या मुलीची आपबिती, ऐकून पोलीसही शहारले

मुंबई : एक आई आपल्या १५ वर्षांच्या मुलीवर तिच्या मित्राकडून गेल्या अनेक वर्षांपासून बलात्कार करुन घेत असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आई-मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना मुंबईतून समोर आली आहे. मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आई आणि तिच्या मित्राला अटक केली आहे. मुलीने सांगितले की, व्हिडीओ कॉल दरम्यान तिची आई तिला कपडे काढण्यासाठी जबरदस्ती करत असे. या प्रकाराबद्दल कोणाशी बोलू नये म्हणून तिची आई तिला धमकावत असे.
मुंबईतील निर्मल नगर भागात एका आईने आपल्या १५ वर्षांच्या मुलीवर, आईच्याच मित्राने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. आरोपी आई आणि मुलीवर २०२२ ते २०२५ दरम्यान मित्राने अनेकवेळा बलात्कार केला. पीडितेने पोलिसांना सांगितले की, ती शालेय विद्यार्थिनी असून ती तिच्या आईसोबत राहत होती. आई-वडिलांचा घटस्फोट झाल्याने वडील वेगळे राहतात. पीडितेने सांगितले की, तिच्या आईचा मित्र, आईच्या संमतीने तिच्यावर अनेकदा बलात्कार करत असे. पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करत पीडितेची वैद्यकीय तपासणी केली.
आईने मित्राकडून मुलीवर बलात्कार करवला
वारंवार बलात्कार केल्यामुळे पीडितेला संसर्ग झाल्याचे तपास अहवालात समोर आले आहे. अहवाल समोर आल्यानंतर आरोपी आई आणि तिच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी आईला अटक केल्याचे सांगितले. त्याचवेळी पोलीस आता अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत. त्याला लवकरच अटक करण्यात येईल.
मुलीला व्हिडिओ कॉलवर तिचे कपडे काढायला लावले
मीडिया रिपोर्टनुसार, पीडितेने तक्रारीत म्हटले आहे की, तिच्या आईने वर्ष २०२४ पासून ८ जानेवारी २०२५ दरम्यान एका मित्रासोबत व्हिडिओ कॉल दरम्यान तिला कपडे काढण्यास भाग पाडले. पोलिसांनी आरोपी आई आणि तिच्या मित्राविरुद्ध भारतीय न्याय संहिता(BNS) आणि पोक्सो कायद्याच्या विविध कलमांखाली बलात्काराचा आरोप असलेल्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.