AmravatiLatest NewsLocal News
आजच्या शिक्षणातून संस्कारक्षम विद्यार्थी घडावा – माजी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले

शिक्षणाबाबत समाजाच्याही अपेक्षा आहेत. समाज सुसंस्कृत, सुशिक्षित करणे हेही विद्यापीठांचे काम आहे. व्यक्तिमत्व विकास, सुदृढ नागरिक कसा घडेल, पौराणिक काळात गुरुकुल पध्दतीने शिक्षण दिल्या जात होते. तक्षशिला, नालंदा, मिथिला यासारखी विद्यापीठे त्याकाळी जगप्रसिध्द होती आणि सर्व विद्याशाखांमध्ये विद्याथ्र्यांना शिक्षण दिल्या जायचे. त्यामुळे आजच्या शिक्षणातूनही संस्कारक्षम विद्यार्थी घडावा, असे आवाहनात्मक प्रतिपादन राज्यस्तरीय गुणवत्ता हमी कक्षाचे अध्यक्ष तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा जनसंपर्क विभाग आणि जवाहरलाल दर्डा इन्स्टिट¬ुट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, लोहारा, जि. यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने व डॉ. श्रीमती कमलताई काशीराव देशमुख, नागपूर यांच्याकडून प्राप्त झालेल्या दाननिधीमधून विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. के.जी. देशमुख स्मृती व्याख्यानमाले आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी प्रमुख वक्ता म्हणून "उच्च शिक्षणामधील बदलते प्रवाह व आव्हाने" या विषयावर व्याख्यान देतांना ते बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, श्री जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटी, यवतमाळचे सचिव श्री. किशोर दर्डा, दानदात्यांचे प्रतिनिधी श्री राजेंद्र देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. तत्ववादी, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर उपस्थित होते.
डॉ. प्रमोद येवले पुढे म्हणाले, भारत एक महाशक्ती, महागुरू म्हणून उदयास येत आहे. ब्रिाटीश काळात बाबु तयार करण्याची शिक्षण पध्दती होती, स्वातंत्र्योत्तर काळानंतर अऩेक शिक्षण संस्था सुरू होऊन शिक्षण क्षेत्राची व्यापकताही वाढली आणि शिक्षणातील प्रवाह कसे बदलत गेले, याचाही त्यांनी यावेळी उहापोह केला. शिक्षण पध्दती विद्यार्थी केंद्रीत करण्यासाठी शिक्षण पध्दतीचा विस्तार करुन सर्वांना शिक्षण मिळावे, यासाठी विविध आयोग भारतात स्थापन झालेत. पहिल्या शिक्षण पध्दतीपासून झालेला बदल, त्याचा विद्याथ्र्यांना झालेला लाभ यावरही त्यांनी प्रकाश टाकला.
ते म्हणाले, 1965 पासून खाजगीकरणाला शिक्षण पध्दतीत सुरुवात झाली. आज शिक्षणातील गुणवत्ता कशी वाढविता येईल, हे सुध्दा आव्हानच आहे. संख्यात्मक वाढ झाली असली, तरी गुणात्मक वाढ होणे अत्यावश्यक आहे. जगातील तिस-या क्रमांकाची शिक्षण पध्दती भारतात आहे. मात्र आपण गुणवत्तेवर दिला पाहिजे, पेटेंट, नोबेल यासारख्या क्षेत्रात आपण मागे का आहोत, याचीही कारणमिमांसा करणे आवश्यक आहे. शिक्षण रोजगाराचे माध्यम समजल्या जाते, परंतु संशोधन पीएच.डी. पर्यंतच मर्यादित राहतं. इन्क्रिमेंट आणि नियुक्तीसाठी पीएच.डी. अनिवार्य करुन चालणार नाही. नवीन शैक्षणिक धोरण समाजाच्या तळागाळापर्यंत पोहचले पाहिजे. नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी हे सुध्दा मोठे आव्हान आहे, त्यामुळे त्यासाठी सर्वांनी पुढे यायला पाहिजे, प्राध्यापकवर्गांनी रोडमॅप तयार करावा.
शिक्षण क्षेत्रात जागतिक स्तरावर मोठी स्पर्धा आहे. सर्वच विद्यापीठांच्या समस्या सारख्याच आहेत. अशा परिस्थितीत कुलगुरूंसमोर अनेक आव्हाने उभी ठाकली आहेत. स्वायत्तता, क्लस्टर युनिव्र्हसिटी काळाची गरज आहे. उद्योगानुरुप आणि व्यावहारिक ज्ञान विद्याथ्र्यांना मिळाले पाहिजे. परीक्षेमधील तीन तासातच विद्याथ्र्यांचे ग्रेडेशन शक्य नाही, त्यामुळे परीक्षा पध्दतीमध्ये बदल करणे आवश्यक आहे आणि महाविद्यालये जेव्हा स्वायत्त होतील, तेव्हांच ते शक्य होईल, असेही डॉ. येवले म्हणाले. तंत्रज्ञानाने मोठी झेप घेतली आहे, ए.आय. चा मोठा वापर होत आहे. अशा परिस्थिमध्ये हजारो नोक-या जातीलही, परंतु त्यापेक्षा कितीतरी पटीने नोक-याही निर्माण होतील, असे सांगून नवीन बदल आपण स्वीकारले पाहिजेत, सोबतच आपले संस्कार जतन होणे देखील आवश्यक आहे.मातृभाषेतून शिक्षण मिळावे, अभ्यासक्रम तयार व्हावेत, पण यातील आव्हाने देखील प्राध्यापकांनी स्वाकारली पाहिजेत. महाविद्यालयांनी स्वत:चे फंड निर्माण करावेत. गुणात्मक विद्यार्थी तयार व्हावेत. समस्या आहेत, पण त्यावर मात करता येणे शक्य आहे.
विद्याथ्र्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक उपक्रम सुरू होत आहेत. ऑनलाईन इंटर्नशिप सुरू होत आहे. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थी हाच केंद्रबिंदू आहे. पाठांकर पध्दतीत बदल करुन अॅप्लीकेशन शिक्षण कसं राहील, यावर नवीन शैक्षणिक धोरणामध्ये भर दिलेला आहे. प्रत्येक विद्याथ्र्याने आपण कोठे आहोत, हे पाहणे गरजेचे आहे, उद्योगानुरुप मनुष्यबळ निर्माण होण्यासाठी अभ्यासक्रमांमध्येही बदल होत असल्याचे डॉ. प्रमोद येवले यांनी याप्रसंगी स्पष्ट केले.