LIVE STREAM

City CrimeLatest News

पलाश लाईनमध्ये अफलातून चोरीचा प्रकार, विद्यार्थीनीच्या गारमेंटसह चोरट्याचा धुमाकूळ!

गाडगे नगर पलाश लाईन परिसरात एका अफलातून चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. गेल्या 20 दिवसांपासून या परिसरात दोन गल्ल्यांमध्ये चोरीच्या घटना घडत आहेत. खासकरून विद्यार्थ्यांच्या वर्दळीच्या परिसरात एका चोरट्याने हैदोस घातला, मध्यरात्री चोरट्याने एका भाडेकरू विद्यार्थिनीच्या खोलीत प्रवेश केला. चोरीच्या दरम्यान, चोरट्याने तीन मोबाईल, कपडे आणि नगद रक्कम चोरली. विशेष म्हणजे, त्या चोरट्याने काही विदहयार्थीनी चे गारमेन्ट वर सुद्धा हात सफा केला. एका विद्यार्थिनीचा ट्रॅकसूट चोरी करून तोच परिधान करून पलायन केले. सी सीटीव्ही कॅमेरात चोरट्याचा चेहरा आणि त्याच्या पळून जाण्याचे दृश्य कैद झाले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये विद्यार्थिनीने ओळखले की तो तिचा ट्रॅकसूट परिधान करत होता. या घटनेची माहिती मिळताच,चोरट्याच्या शोधात परिसरातील नागरिकांनी रात्रीच जागरण सुरु केले आणि व्हाट्सग्रुप तयार करून चोरट्याच्या शोधात लागले. एवधच नाहीतर चोरटा ओळखू यावा करिता मोठ्या मर्क्युरी लाईटची व्यवस्था करण्यात आली ,,शुक्रवार च्या पहाटे 4 वाजताच्या सुमारास पुनः चोरट्याने त्याच पलाश लाइन मध्ये प्रवेश केला , यात 2 युवकाने मिळून चोरट्याचा पाठलाग केला, चोरट्याचा दुसऱ्या चौधरी लाइन पर्यत पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला मात्र युवक पकडण्यात अयशस्वी झाले. हा संपूर्ण पाठलाग चे दृश्य दोन सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले .. नगरिकानी पहाटे च गाडगे नगर पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली , पोलिसानी सर्व परिसर पिंजून काढला तरी तो अज्ञात चोरटा मिळाला नाही त्याच पहाटे नागरिकांनी पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांना फोनवर माहिती दिली. चोरमले यांनी घटनास्थळी जाऊन चौधरी लाईनची पाहणी केली, आणि डॉग स्कॉडला पाचारण केले. डॉगने चोरटा सोडून गेलेल्या चप्पलचा वास घेऊन सुमारे 100 मीटर अंतरापर्यंत पळत सुटला यात चोरटा कोणत्या दिशेने पळाला याचा डॉग ने सुगावा घेतला, परंतु त्याचा शोध अजूनही पूर्ण झाला नाही.या अफलातून चोरी बद्दल येथील स्थानिक नागरिकाणी आमच्या सिटी कडे प्रतिक्रिया व्यक्त केल्या ,, पोलिसानी लवकर त्या चोरट्याचा शोध घ्यावा सोबतच रात्री पोलिसांची गस्त वाढविण्यात यावी अशी मागणी करण्यात आली .. या घटनेत आता गाडगे नगर पोलिस आणि गुन्हे शाखेचे पथक चोरट्याच्या शोधात लागले आहे . मात्र, या परिसरात अद्याप भीतीचे वातावरण कायम आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!