AmravatiLatest NewsLocal News
बदलत्या काळानुसार सर्वांनी बदल करणे आवश्यक – कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते

अध्यक्षीय भाषण करतांना कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते म्हणाले, काळानुरुप बदल आवश्यक असतात. त्यामुळे विद्याथ्र्यांच्या सर्वांगीण भविष्यासाठी आपण सर्वांनी काळानुरुप बदल करावेत. पूर्वीच्या मानसिकतेतून बाहेर पडावे. नवीन बदल आपण स्वीकारले पाहिजेत. आपल्यासमोर असलेली आव्हाने, आपण पेलली पाहिजेत. पूर्वीचे ज्ञानार्जनाचे शिक्षण नंतर अर्थार्जनाचे झाल्याने समस्या सुरू झाल्यात. आता नवीन शैक्षणिक धोरण लागू झाले आहे आणि क्रांतिकारक बदल होत आहेत. नवीन शैक्षणिक धोरणाचा विद्यार्थी हाच केंद्रबिंदू आहे व विद्याथ्र्याला समोर ठेवून नवीन शैक्षणिक धोरणाची आखणी करण्यात आलेली आहे. विद्यार्थी शिक्षण घेत असतांना त्याला प्रॅक्टीकल अॅप्रोच तितकाच आवश्यक आहे, जेणेकरुन विद्याथ्र्यांना आपण कोठे आहोत व पुढे त्या शिक्षणाचा काय उपयोग होणार आहे, हे कळेल.
तंत्रज्ञानाशिवाय आज आपल्याला पर्याय नाही. विद्यापीठाचेही उद्योगानुरुप विद्यार्थी घडावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत. अनेक आव्हाने आहेत, मात्र त्यासाठी विद्यापीठाकडून प्रयत्न देखील सुरू आहेत. अनेक योजना आखण्यात आलेल्या आहेत. तंत्रज्ञानात विद्यार्थी कुठेही मागे राहणार नाही, याकडेही विद्यापीठाचे लक्ष आहे. इन्स्टिट¬ुशन डेव्हलपमेंट प्लॅन विद्यापीठ तयार करीत असून त्यासाठी महाविद्यालयांचे प्राचार्य, सर्व विभागप्रमुख, संस्थाचालकांनीही आपल्या सूचना कराव्यात, असे सांगून त्यांनी व्याख्यानमाला आय़ोजनासाठी केलेल्या सहयोगाबद्दल महाविद्यालय प्रशासन, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व संस्थेचे आभार मानले. याप्रसंगी श्री जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटी, यवतमाळचे सचिव श्री. किशोर दर्डा, दानदात्यांचे प्रतिनिधी श्री राजेंद्र देशमुख यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
राष्ट्रगीत व विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविकातून जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांनी आयोजनामागील भूमिका मांडली. सूत्रसंचालन श्री मिलींद पोपट यांनी, तर आभार प्राचार्य आर.आर. तत्ववादी यांनी मानले. व्याख्यान कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.