मातोश्री कृष्णाबाई देशमुख शाळेत क्षय रोग मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाच्या “शंभर दिवस कार्यक्रम” अंतर्गत क्षय रोग, कुष्ठ रोग, व एचआयव्ही यासारख्या आजारांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने प्रभू कॉलनीतील मातोश्री कमलाबाई देशमुख शाळेत अमरावती महानगरपालिकेच्या क्षय रोग विभागातर्फे मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने ‘शंभर दिवस कार्यक्रम’ अंतर्गत अमरावती शहरात क्षय रोग जनजागृती शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.
शंभर दिवस कार्यक्रमाच्या अंतर्गत संपूर्ण शहरातील मनपा व खाजगी शाळांमध्ये आरोग्य शिबिर आयोजित करण्याचे आदेश मनपा आयुक्त सचिन कलंत्रे व आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे यांनी दिले. या अंतर्गत प्रभू कॉलनीतील मातोश्री कमलाबाई देशमुख शाळेत क्षय रोग मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. फिरोज खान (शहर क्षय रोग अधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिरात नागरिकांना क्षय रोगाबद्दल सखोल माहिती देण्यात आली. डॉ. रुपेश खडसे (शहर साथरोग अधिकारी) यांनी टीबी मुक्त भारतासाठी प्रतिबंधात्मक उपायांवर भर देत नागरिकांना जागरूक राहण्याचे आवाहन केले. “खोकल्यातून रक्त पडत असेल तर तातडीने जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात मोफत तपासणी करून घ्या,” असा सल्ला डॉ. फिरोज खान यांनी दिला.
मुख्याध्यापक तेलमोरे, टीबी पर्यवेक्षक कांबळे, आरोग्य सेवक बबन खंडारे यांनीही मार्गदर्शन केले. आशा वर्कर आणि परिचारिका कर्मचाऱ्यांनी मेहनत घेत कार्यक्रम यशस्वी केला. शिबिराच्या शेवटी चार विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले. “अमरावती महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणारे हे आरोग्य शिबिर जनतेसाठी उपयुक्त ठरत आहे.