शोभा नगर येथील जय अंबे महिला भजनी मंडळाच्या वतीने श्री गजानन महाराजांच्या विजय ग्रंथाचे पारायण

अमरावतीच्या शोभा नगर येथील जय अंबे महिला भजनी मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्री गजानन महाराजांच्या विजय ग्रंथाचे पारायण आजपासून सुरू करण्यात आले आहे. “शोभा नगर येथील जय अंबे महिला भजनी मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्री गजानन महाराजांच्या विजय ग्रंथाचे पारायण सुरू करण्यात आले आहे. या पारायणाची सुरुवात शोभा नगर येथील जय मा अंबे नवदुर्गा मंदिरातून झाली आहे. तर दुसरीकडे, 20 तारखेला गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त, या पारायणाची सांगता होणार आहे. भजन मंडळाच्या सदस्यांनी वीस तारखेपर्यंत आपल्या घरी श्री गजानन महाराज विजय ग्रंथाचे पारायण आयोजित केले आहे. या पारायणाच्या आयोजनाबद्दल जय अंबे महिला भजनी मंडळाच्या रोशनी दुबे यांनी माहिती दिली. श्री गजानन महाराजांच्या विजय ग्रंथाच्या पारायणामुळे शोभा नगरमध्ये एक धार्मिक वातावरण निर्माण झालं आहे. या मंडळाने ही परंपरा जपली आहे.