Amaravti GraminLatest News
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कारात गोलमाल!

"संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार वाटपाच्या प्रक्रियेत मोठा घोटाळा उघडकीस आला आहे! जिल्ह्यातील वागडोह आणि घुईखेड ग्रामपंचायतींना पुरस्कार मिळाले असले तरी, प्रत्यक्षात स्वच्छतेची ऐशी-तैशी असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. प्रशासनाने केवळ कागदावर निरीक्षण करून पुरस्कार दिल्याने गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पाहुयात संपूर्ण प्रकरणाचा अहवाल..."
"संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत घुईखेड ग्रामपंचायतीला जिल्ह्यातील पहिला क्रमांक तर वागडोह ग्रामपंचायतीला दुसरा क्रमांक मिळाला. मात्र, सहारा समाचारच्या पाहणीत अनेक त्रुटी आढळून आल्या.
ग्रामस्थांनी या प्रकरणात प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे, पुरस्कार देण्यासाठी आलेल्या तपासणी टीमने प्रत्यक्ष गावाची पाहणी केलीच नाही. ग्रामपंचायतीत बसूनच सर्व प्रक्रिया पार पाडली, असा गंभीर आरोप ग्रामस्थ करत आहेत."
"स्वच्छतेचा आदर्श दाखवणाऱ्या या पुरस्कार प्रक्रियेतच मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप गावकरी करत आहेत. प्रशासनाच्या या कागदी कामांमुळे प्रत्यक्षात गावातील समस्या दुर्लक्षित राहतात. संत गाडगेबाबांच्या नावाने सुरू झालेल्या या अभियानाला योग्य न्याय मिळेल का? प्रशासन यावर काय उत्तर देणार? पाहणे गरजेचे ठरणार आहे.