अमरावती महानगरपालिका अधिकारी कर्मचारी व शिक्षक “सांस्कृतिक व क्रीडा मंच “
अमरावती :- आयोजित दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आज शनिवार दिनांक ०१ फेब्रुवारी २०२५ रोजी माननीय आयुक्त मनपा श्री सचिन कलंत्रे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी मनपा मुख्य लेखाधिकारी नरेंद्र फिस्के, शिक्षणअधिकारी डॉक्टर प्रकाश मेश्राम, अतिरिक्त आयुक्त श्री महेश देशमुख , मनपा उपायुक्त श्री नरेंद्रजी वानखडे, मनपा कर्मचारी संघटनेचे सचिव प्रल्हाद कोतवाल ,सहायक आयुक्त नंदकिशोर तिखिले, लेखा विभाग अधीक्षक श्री प्रवीण इंगोले, मनपा कार्यकारी अभियंता श्री रवींद्र पवार, बाजार परवाना अधीक्षक उदय चव्हाण ,पशु शल्य चिकित्सक डॉक्टर सचिन बोंद्रे, माजी सैनिक श्री नामदेव मेटांगे , तसेच क्रीडा मंच अध्यक्ष श्री योगेश पखाले ,कार्याध्यक्ष कुणाल बांबल, एहफाज खान, अनुप भारंबे ,पंकज अकोडे ,रणजीत नितनवरे ,मोहसीन खान, सुरज जाधव उपस्थित होते.
स्पर्धेमध्ये बाजार परवाना विभाग, सामान्य प्रशासन विभाग, ADTP विभाग, मनपा शिक्षक , असोसिएशन उर्दू स्कूल निदान स्कूल कंत्राटदार असोसिएशन कॉलेज या टीमने सहभाग घेतलेला आहे.