Latest NewsNanded
तिसरा हप्ता न मिळाल्याने नांदेडच्या माहूर शहरातील घरकुल लाभार्थ्यांच्या घरकुलांची कामे रखडले

नांदेडच्या माहूर शहरात पंतप्रधान आवास योजने अंतर्गत 1367 घरकुलांना 2017 मध्ये मंजुरी मिळाली.घरकुलांचा लाभ मिळल्याने लाभार्थ्यांनी घरकुलाच्या कामाला देखील सुरुवात केली.1367 पैकी 800 घरकुल लाभार्थ्यांनी घरकुलांची कामे पूर्ण केली आहेत.या घरकुल लाभार्थ्यांनी घरकुलाचे काम पूर्ण करण्यासाठी कर्ज काढले. या लाभार्थ्यांना दोन हप्ते देखील मिळाले.परंतु तिसरा आणि शेवटचा हप्ता अजून मिळाला नाहीय.त्यामुळे हे घरकुल लाभार्थी कर्ज बाजरी झाले आहेत.मागील सहा वर्षापासून हे लाभार्थी माहूर नगरपंचायती कडे पाठपुरावा करीत आहेत.परंतु अद्याप एक लाख 10 हजार रुपयांचा तिसरा हप्ता मिळाला नसल्याने हे लाभार्थी कर्जबाजारी झाले आहेत.