LIVE STREAM

India NewsLatest NewsSports

संघात नाव नसतानाही सामना खेळला आणि विजयाचा हिरो कसा ठरला हर्षित राणा, जाणून घ्या नियम…

पुणे :- भारताच्या विजयाचा हिरो ठरला तो हर्षित राणा. पण भारताचा संघ जेव्हा जाहीर झाला तेव्हा हर्षित राणाचं भारताच्या ११ खेळाडूंच्या संघात नाव नव्हतं. पण तरीही हर्षित राणा भारतीय संघात कसा आला आणि कसा काय खेळला, याची चर्चा सुरु झाली आहे. त्यावेळीच याबाबतचा नेमका नियम आहे तरी काय, हेदेखील समोर आले आहे.

संघात नसतानाही हर्षित राणा कसा सामना खेळला..

सूर्याने टॉसनंतर जेव्हा भारताचा संघ जाहीर केला तेव्हा त्यामध्ये हर्षित राणाचे नाव नव्हते. पण भारतीय संघ गोलंदाजी करायला आला त्यावेळी मात्र हर्षित राणा खेळताना दिसला. या सामन्यात शिवम दुबेला संधी देण्यात आली होती. शिवमने या संधीचे सोने केले आणि त्याने अर्धशतकी खेळी साकारली. पण त्यानंतर शिवमला दुखापत झाली. ही दुखापत गंभीर स्वरुपाची होती आणि त्यामुळे त्याला यापुढे सामना खेळता येणार नाही हे स्पष्ट झाले होते. त्यावेळी कन्केशनचा नियम अंमलात आणण्यात आला. त्यामुळे शिवमच्या जागी हर्षित राणाला भारताच्या संघात स्थान देण्यात आले. हर्षित राणाचा हा पहिलाच सामना होता. हर्षित राणाने या संधीचा चांगलाच फायदा घेत संघाला सामना जिंकवून दिला.

हर्षित राणा कसा ठरला विजयाचा हिरो…

सूर्याने हर्षित राणाच्या हाती चेंडू सोपवला आणि त्याने पहिल्याच षटकात भारतीय संघाला विकेट मिळवून दिली. भारतासाठी धोकादायक ठरत असलेल्या लायम लिव्हिंगस्टोनला राणाने प्रथम बाद केले. त्यानंतर राणाने जेकब बेथेलची विकेट काढली. त्यावेळी भारत हा सामना जिंकू शकतो, अशी आशा निर्माण झाली होती. पण त्यावेळी इंग्लंडचा जेमी ओव्हर्टन हा तुफानी फटकेबाजी करत होता. तो इंग्लंडला सामना जिंकवून देईल, असे वाटत होते. पण त्यावेळी पुन्हा एकदा भारताच्या मदतीला धावून आला तो हर्षित राणा. यावेळी हर्षित राणाने ओव्हर्टनला क्लीन बोल्ड केले आणि सामना भारताच्या बाजूने फिरवला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!