सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार, २०२५ मध्ये ४०००० घरं बांधणार

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्वसामान्यांसाठी मोठी घोषणा केली. सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. २०२५ मध्ये तब्बल ४० हजार घरं बांधणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. त्यामुळे यावर्षामध्ये अनेक सर्वसामान्य नागरिकांना हक्काचे घर मिळणार आहे. अर्थमंत्र्यांच्या या घोषणेनंतर सर्वसामान्य नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेमध्ये अर्थसंकल्प सादर करत आहेत. या अर्थसंकल्पाकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे. सर्वसामान्यांना या अर्थसंकल्पातून नेमकं काय काय मिळणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. अशामध्ये निर्मला सितारामन यांनी घरांबाबत मोठी घोषणा केली.
२०२५ मध्ये म्हणजे या वर्षामध्ये आणखी ४० हजार नागरिकांच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. सरकार ४० हजार घरं बांधणार असून परवडणाऱ्या किंमतीमध्ये सर्वसामान्यांना ही घरं खरेदी करता येणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना यावर्षामध्ये हक्काचे घर मिळणार आहे.
दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन १८ व्या लोकसभेचा पहिला आणि मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन यांचा हा लागोपाठ आठवा अर्थसंकल्प आहे. २ फेब्रुवारीला रविवार असल्याने सुट्टी आहे. त्यानंतर ३ फेब्रुवारी ते ६ फेब्रुवारी या दोन दिवसांत लोकसभा आणि राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ फेब्रुवारीला राज्यसभेत चर्चेला उत्तर देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.