पुण्यात ठाकरे गटाला बसणार मोठा धक्का ? जुना शिलेदार सोडणार साथ ? नेमका कोण ?

पुणे :- आगामी महापालिका निवडणुकीआधी सगळे पक्ष तयारीला लागले आहे. निवडणुकांच्या तारखा कधीही जाहीर होऊ शकतात. यादरम्यान शिंदेंच्या शिवसेनेचे ऑपरेशन टायगर चर्चेत आहे. ठाकरे गटाच खासदार आपल्याकडे घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासोबतच स्थानिक नेत्यांनाही आपल्याकडे घेण्याचा शिंदे गटाचा कल दिसत आहे. अशातच पुणे शहरात ठाकरेंना जुने शिलेदार सोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. कोण आहेत तो नेता? ठाकरेंना जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत दिसत आहे.
पुण्यातील शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांच्या शिंदे गटात जाण्याची चर्चा सुरू आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राहिलेल्या चंद्रकांत मोकाटे यांनी शिवसेनेचे मंत्री उदय सामंत याची भेट घेतली आहे. मोकोटे यांच्या जाण्याने ठाकरे गटासाठी सेटबॅक ठरणार आहे. या भेटीनंतर मोकाटे यांनी आपण वैयक्तिक कारणासाठी भेटल्याचं सांगितलं आहे. मात्र तरीसुद्धा त्यांनी पण ठाकरे गटामध्ये नाराज असल्याचं जाहीरपणे म्हटलं आहे. विधानसभा निवडणूक लढवली त्यावेळी पक्षातील इच्छुकाने काम केलं नाही, त्याच व्यक्तीला माझ्य शेजारी बसवण्यात आलं होतं. यासंदर्भात वरिष्ठांकडे नाराजी सांगितली असून त्यांनी चूक झाल्याचं कबूल केली, असं चंद्रकांत मोकाटे यांनी सांगितलं.
बैठकीतून तडकाफडकी मोकाटे बाहेर
पुण्यात शिवसेना ठाकरे गटाची सचिन अहिर, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, नेत्या सुषमा अंधारे, माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार, माजी नगरसेवक वसंत मोरे आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली होती. या बैठकीमधून चंद्रकांत मोकाटे तडकाफडकी बाहेर पडले होते. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे बैठकीला आल्यावर त्यांना खुर्ची देत मोकाटे निघून गेले होते. त्यामुळे अंधारे येताच मोकाटे हे बाहेर गेल्याने ते नेमके कोणामुळे बाहेर गेले हा संभ्रम झाला. विधानसभेला शिवसेनेकडून इच्छुक असणारी व्यक्ती म्हणजे पृथ्वीराज सुतार आहेत. सुतार हे माजी नगरसेवक राहिले आहेत. विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये शिवसेनेचे माजी आमदार आणि ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत मोकाटे यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात कोथरूड विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवली होती.