अपात्र लाडक्या बहिणींवर गुन्हे दाखल होणार ?

महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रसिद्ध झाली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळतात. लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. आता ज्या महिलांनी नियम डावलून योजनेचे पैसे घेतले. त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे सांगितले जात आहे. आता बोगस लाडक्या बहिणींचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. ज्या बहिणींना नियमात बसत नसतानाही लाभ घेतला त्यांच्यावर कारवाई करा, असं महायुतीच्या नेत्याने सांगितले आहे .
याबाबत महायुतीचे नेते आणि लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. शासनाची योजना आहे. त्याचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलाच नाही पाहिजे. त्यामुळे या महिलांचे अर्ज रद्द होतील. त्या महिलांवर गुन्हेदेखील दाखल होतील, असंही त्यांनी सांगितले. लातूर जिल्ह्यातील ५ लाख ९२ हजार महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यातील २५ हजार लाडक्या बहिणींना नियमांत न बसतानाही लाभ घेतला आहे. त्यामुळे २५ हजार लाडक्या बहिणींचे अर्ज बाद केले आहे.
याआधीही नियमांत न बसतानाही योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांवर कारवाई करण्यात आले असल्याचे आदिती तटकरेंनी सांगितले.लाडकी बहीण योजनेत बनावट कागदपत्र वापरुन लाभ घेण्याचा प्रकार अंगणवाडी सेविकांच्या सजगतेमुळे सप्टेंबर महिन्यातच निर्दशनास आला. याबाबत ऑक्टोबर महिन्यात पोलिसांत रितसर तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे अर्जांची तपासणी केली जाणार आहे. फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितले.
राज्यात तब्बल ३० लाख लाडक्या बहिणी अपात्र असल्याचे सांगितले जात आहे. काही परराज्यातील महिलांनीही या योजनेचा लाभ घेतला असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे बोगस लाडक्या बहिणींचे अर्ज बाद करण्यासाठी यंत्रणा काम करत आहे.