अमरावती महानगरपालिकेच्या ‘सांस्कृतिक व क्रीडा मंच’ तर्फे आयोजित क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण

अमरावती महानगरपालिका अधिकारी कर्मचारी व शिक्षक ” सांस्कृतिक व क्रीडा मंच ” तर्फे आयोजित दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रम नुकतेच पार पडले. उद्घाटन शनिवार दिनांक ०१ फेब्रुवारी २०२५ रोजी माननीय आयुक्त मनपा श्री सचिन कलंत्रे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी मनपा मुख्य लेखाधिकारी नरेंद्र फिस्के, शिक्षणअधिकारी डॉक्टर प्रकाश मेश्राम, अतिरिक्त आयुक्त श्री महेश देशमुख , मनपा उपायुक्त श्री नरेंद्रजी वानखडे, मनपा कर्मचारी संघटनेचे सचिव प्रल्हाद कोतवाल ,सहायक आयुक्त नंदकिशोर तिखिले, लेखा विभाग अधीक्षक श्री प्रवीण इंगोले, मनपा कार्यकारी अभियंता श्री रवींद्र पवार, बाजार परवाना अधीक्षक उदय चव्हाण ,पशु शल्य चिकित्सक डॉक्टर सचिन बोंद्रे, माजी सैनिक श्री नामदेव मेटांगे , तसेच क्रीडा मंच अध्यक्ष श्री योगेश पखाले ,कार्याध्यक्ष कुणाल बांबल, एहफाज खान, अनुप भारंबे ,पंकज आकोडे ,रणजीत नितनवरे ,मोहसीन खान, सुरज जाधव,बिट्टू डेंडूले, जमील अहमद यांचे उपस्थितीत पार पडले होते. तसेच दोन दिवसीय स्पर्धा समाप्तीनंतर
मनपा झोन क्रमांक तीन हा संघ विजेता ठरला असून त्यांना तसेच उपविजेता संघ सामान्य प्रशासन विभाग यांना ट्रॉफी मोमेंट देऊन व रोख रक्कम बक्षीस देऊन उपस्थित नंदकिशोर तीखीले, मंगेश कडू , उदय चव्हाण, डॉक्टर सचिन बोंद्रे ,प्रल्हादजी कोतवाल, प्रवीणजी इंगोले तसेच आयोजकांच्या वतीने अध्यक्ष योगेश पखाले ,सचिव एहफाज उल्लाखान,जमील अहमद, यांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले. तसेच बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट शिवम डेंडवालबेस्ट बॅट्समन ऑफ द टूर्नामेंट श्री कुणाल बांबल
तसेच मॅन ऑफ द सिरीज शिवम डेंडवाल यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. स्पर्धेमध्ये बाजार परवाना विभाग, सामान्य प्रशासन विभाग, ADTP विभाग, मनपा शिक्षक , असोसिएशन उर्दू स्कूल ,निदा स्कूल, फ्रेंड्स स्कूल,सैफिया स्कूल, राम मेघे इंजिनियरिंग कॉलेज, कंत्राटदार असोसिएशन कॉलेज या टीमने सहभाग घेतलेला होता .
सदर स्पर्धा या ” सांस्कृतिक व क्रीडा मंच ” च्यावतीने आयोजित केले असून अशा स्पर्धा रेगुलर व नियमितपणे कर्मचाऱ्यांच्या शारीरिक मानसिक दुरुस्तीकरिता होणे अपेक्षित असल्याचे मत यावेळेस सहाय्यक आयुक्त नंदकिशोर केले व उपस्थित मान्यवर यांनी व्यक्त केले तसेच उत्कृष्ट आयोजनाबद्दल आयोजकांचे सुद्धा अभिनंदन व कौतुक केले.