गुरुकुंज मोझरी बायपास मार्गाचे काम अंतिम टप्यात

गुरुकुंज मोझरी :- आज आपण बोलणार आहोत गुरुकुंज मोझरी बायपास मार्गाच्या अंतिम टप्प्यातील कामाबद्दल. हा महामार्ग लवकरच जड वाहतुकीसाठी खुला होणार आहे आणि त्यामुळे वाढत्या अपघातांच्या संख्येत मोठी घट होणार आहे. पाहूया संपूर्ण माहिती. अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर गुरुकुंज मोझरीजवळील शेंदोळा खुर्द ते तळेगाव ठाकूर या ६ किमी लांबीच्या बायपास मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माहितीनुसार, पुढील दोन महिन्यांत हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.
यामुळे अमरावती-नागपूर मार्गावरील वाढती वाहतूक आणि अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होईल. बायपाससाठी ५२ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येत असून, हा प्रकल्प जड वाहनांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवावेळी लाखोंच्या संख्येने भाविक येतात. त्यामुळे येथे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. नव्या बायपास मार्गामुळे हा धोका टाळता येणार आहे.
दरम्यान, हा प्रकल्प २०२४ अखेरीस पूर्ण होणार होता, मात्र सततच्या पावसामुळे आणि शेतकऱ्यांच्या अतिरिक्त अंडरपास पुलाच्या मागणीमुळे काम थोडे लांबले. आता हे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.तर हा होता गुरुकुंज मोझरी बायपास मार्गाबाबतचा संपूर्ण अहवाल. लवकरच हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होईल आणि अपघातांचे प्रमाण कमी होईल. अशीच महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा city news.