चित्रा चौक, सरोज चौक, कांती चौक, वल्लभ भुवन येथील आस्थापनामध्ये फायर सेप्टी ऑडीट व अग्निसुरक्षाबाबत तपासणी

सोमवार दिनांक ३ फेब्रुवारी,२०२५ रोजी धोराजी स्विट्स अॅंड नमकिन चित्रा चौक, मथुरा जलेबी चित्रा चौक, आर.वी. धोराजीवाला, चित्रा गुजरात, कांती चौक, बनारसी भोजनालय, चित्रा चौक, गुजरात कांती भुवन सरोज चौक, न्यु कन्हैया कोल्ड्रिंग्स अॅंड रेस्टॉरंट्स, वल्लभ भुवन या आस्थापनांची पाहणी महानगरपालिका उपआयुक्त डॉ.मेघना वासनकर यांनी केली. सदर आस्थापनांची पाहणी केली असता महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ सुधारीत 2023 व एन.बी.सी. नुसार अग्निशमन यंत्रणा आढळून आलेली नाही. सदर आस्थापनाचे फायर सेप्टी ऑडीट व अग्निशमन यंत्रणा नियमानुसार करुन अहवाल अग्निशमन विभागात पंधरा दिवसात सादर करण्याच्या सुचना उपआयुक्त डॉ.मेघना वासनकर यांनी दिल्या.
यावेळी उपआयुक्त डॉ.मेघना वासनकर यांनी अमरावती शहरातील नागरिकांनी महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ सुधारीत 2023 व एन.बी.सी.2016 ची काटेकोरपणे पालन करून आपल्या जिविताचे व मालमत्तेचे आगीपासून होणारे नुकसान टाळण्याचे तसेच अग्निशमन यंत्रणा करून अग्निशमन विभागाकडून अग्निशमन ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात यावे असे आवाहन केले आहे.
यावेळी सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, प्र. मुख्य अग्निशमन अधिकारी लक्ष्मण पावडे, प्र.अग्निशमन अधिक्षक संतोष केंद्रे, फायरमन गौरव दंदे, गोविंद घुले, राहुल घोडे,मोहन वानखेडे, संदीप रामेकर, वाहन चालक तौसीफ उपस्थित होते.