जनता कॉलनी व नवदुर्गा विहार येथे अतिक्रमण हटवण्याची कारवाई

मा.आयुक्त महोदय, मा.उपायुक्त प्रशा यांचे आदेशान्वये झोन क्रमांक 4 अंतर्गत येणारा परिसर जनता कॉलनी, नवदुर्गा विहार येथे कुंभारवाडा मध्ये बरेच लोकांनी येणारा जाणारा मुख्य रस्त्यावर स्वतःचे घराचे समोर बल्ली बासे तसेच लोखंडी टिन चे शेड टाकून , विटा मातीचे कंपाउंड वॉल बांधून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले होते तेथील लोकांची प्राप्त तक्रारीवर, संबंधित सहायक संचालक नगर रचना विभाग व संबंधित झोनचे मान्य उपअभियंता शाखा अभियंता यांचे प्राप्त आवाजावर प्रशासकीय मंजुरी घेऊन दिनांक 30 /01/2025 रोजी सकाळी 11:30 वाजता पासून ते कारवाई संपे पर्यंत संबंधित परिसर चे राजापेठ पोलीस स्टेशन यांचेकडून मिळालेले अतिरिक्त पोलीस बंदोबस्त त्यांचे सहकार्याने सर्व अतिक्रमण पाडण्याची कारवाई करण्यात आली.
सदर कारवाई श्री श्याम चावरे अतिक्रमण पथक प्रमुख, श्री तांबेकर साहेब उपअभियंता, श्री नूर शाखा अभियंता यांची उपस्थितीने व पोलीस विभाग चे कर्मचारी तसेच अतिक्रमण कर्मचारी उपस्थित होते