नव कुंडीय महायज्ञ आणि वसंतोत्सवाचे आयोजन

क्षत्रिय ब्राह्मण समाजाच्या वतीने भव्य नव कुंडीय महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. समाजकल्याण, पर्यावरण संतुलन आणि विद्यार्थ्यांच्या विद्या वृद्धीसाठी आयोजित या कार्यक्रमाबद्दल अधिक जाणून घेऊया आमच्या विशेष रिपोर्टमध्ये.
अमरावतीतील बडनेरा रोडवरील महेश भवन समोरील प्रांगणात क्षत्रिय ब्राह्मण समाज ट्रस्टच्या वतीने शनिवार, 1 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी 2025 दरम्यान माँ सरस्वती आराधना वसंतोत्सव आणि नव कुंडीय महायज्ञ आयोजित करण्यात आला आहे. या पवित्र यज्ञाचे मुख्य उद्देश विश्व जनकल्याण, पर्यावरण संतुलन, विद्यार्थ्यांमध्ये विद्या वृद्धी आणि सामाजिक सौहार्द टिकवणे हे आहेत. या यज्ञाच्या यजमानपदाची जबाबदारी प्रवीण करवा दांपत्याने स्विकारली आहे.
या भव्य सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी क्षत्रिय ब्राह्मण समाज ट्रस्टचे अध्यक्ष भागीरथ पांडे आणि त्यांचे सहकारी विशेष परिश्रम घेत आहेत. भाविक भक्तांसाठी ही एक सुवर्णसंधी असून, यज्ञात सहभागी होऊन पुण्य लाभ घ्यावा असे आवाहन संजय पांडे यांनी केले आहे. – वाईट. संजय पांडे.
तर पाहिले आपण, समाजाच्या कल्याणासाठी आणि अध्यात्मिक उन्नतीसाठी आयोजित हा भव्य यज्ञ महोत्सव. भाविक भक्तांनी या पुण्यसंचयात सहभागी होण्याचे निश्चित करा. अशाच महत्त्वाच्या आणि सकारात्मक बातम्यांसाठी जोडलेले राहा city news सोबत.