LIVE STREAM

Crime NewsLatest NewsMaharashtra

मुंबईच्या जेलमध्ये भेटल्यावर त्यांचा प्लॅन ठरला आणि त्यानंतर सांगलीत ड्रग्सचा कारखाना उघडला; सिनेस्टाईल गुन्ह्यात तिघांना अटक करण्यात आली.

सांगली :- मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या नगरांतील ड्रग्सचं लोन आता महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातही पोहचतानाचं दिसून येत आहे. सांगली जिल्ह्यातील विटा शहरात केमिकल कंपनीच्या नावाखाली चक्क ड्रग्स तयार करण्याची फॅक्टरीच सुरू केल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात उघड झाली. विट्यात माऊली इंडस्ट्रीज नावाने ओळखल्या जाणाऱ्या कंपनीवर सांगली एलसीबीने रात्री उशिरा छापा टाकत कोट्यवधी रुपयांचा एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी कारखाना चालवणाऱ्यासह काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. केवळ केमिकल कंपनीचे नाव दाखवत या ठिकाणी अमली पदार्थांचा व्यवसाय सुरू होता अशी माहिती पोलीस तपासातून पुढे आली आहे. याप्रकरणी, पोलिसांनी आणखी तीन जणांना अटक केली असून मुंबईच्या दोघांसह वाळवा तालुक्यातील एकास अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहात असताना 6 जणांनी मिळून एमडी ड्रग्जचाकारखाना सुरू करायचं ठरवलं होत, अशी माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली.

विट्यातील एमडी ड्रग्जच्या फॅक्टरी उभारणी कारवाईत आता मुंबईच्या दोघांसह वाळवा तालुक्यातील एकास सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली आहे. संशयित जितेंद्र शरद परमार, अब्दुलरज्जाक अब्दुलकादर शेख आणि सरदार उत्तम पाटील अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. विटाजवळील कार्वे येथील औद्योगिक वसाहतीमध्ये बंद कारखान्यात एमडी ड्रग्ज बनवणाऱ्या रहुदिप बोरिचा (रा. कोसंबा, जि. सुरत) सुलेमान शेख (रा. बांद्रा, मुंबई), बलराज अमर कातारी (वय २४, रा. विटा) या तिघांना २७ जानेवारी रोजी सांगली पोलिसांनी अटक केली होती. त्यांनी बनवलेले 29 कोटी रूपयांचे 14 किलो 500 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले.

मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहात झाली ओळख

स्थानिक गुन्हे अन्वेषणकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला असून त्यांनी तिघांची कसून चौकशी केली. त्यानंतर, तपासातून आणखी तिघे संशयित जितेंद्र परमार, अब्दुल रज्जाक शेख, सरदार पाटील यांची नावे निष्पन्न झाली. या 6 जणांची मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहात ओळख झाली होती. या 6 जणांनी जामीनावर मुक्त झाल्यानंतर एकत्र येऊन एमडी ड्रग्जचा कारखाना सुरू करण्याचे ठरवले होते. त्यानुसार, सांगलीती विटा येथे माऊली इंडस्ट्रीज नावाने केमिकलचा कारखाना म्हणून ड्रग्जचा कारखाना सुरू केल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!